क्रमबध्दता - भाग १ (Sequence - Part 1)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘ क्रमबध्दता - भाग १ (Sequence - Part 1) ’ याबाबत सांगितले.

क्रमबध्दता - भाग १ (Sequence - Part 1)

तसं प्राणतत्त्व जेव्हा सौम्यत्व धारण करून क्रमबद्धतेने विकास करतं तेव्हाच सगळ्या जाणीवा प्रबळ होतात. मग अश्या दोन्ही गोष्टी एकत्र आम्हाला कुठे मिळू शकतात? तर एक म्हणजे खर्‍याखुर्‍या नामस्मरणामध्ये. पण नामस्मरण करताना आम्हाला आठवण राहिलच ह्याची आम्हालाच गॅरंटी नाही. जे आहे ते आहे त्याच्यामध्ये लाजायच कारण नाही. आम्ही साधी माणस आहोत नाही राहत बाबा आमच्या स्मरणात आणि त्यासाठीच आवश्यक असतो तो एकच, कोण? हनुमंत. कोण आवश्यक असतो? हनुमंत. जो महाप्राण आहे आणि जो निसर्गातला, निसर्गातली क्रमबद्धता सांभाळणारा एकमेव विश्वव्यापक संचारित आहे, आलं लक्षामध्ये. सगळे क्रम जे आहेत ते कोण सांभाळतो? हा महाप्राण सांभाळतो. हा महाप्राण असल्यामुळे हा प्राणतत्त्व पण आहे आलं लक्षामध्ये आणि at the same time हा कोण आहे? तर, कोण आहे हनुमंत? एक म्हणजे महाप्राण आहे आणि तो प्राणतत्त्व आहे आता सौम्यत्व क्रमबद्धता.

क्रमबद्धता, कशी आहे हनुमंताकडे? काही स्तोत्र वैगरे आठवत असतील विचार करा. आपण म्हणतो अशी स्तोत्र किंवा हे आहेत. मारुती स्तोत्र रामदासांचं, ‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके। तयासी तुळणा कैचि ब्रह्माण्डी पाहता नसे।।’ त्याच्या वज्रपुच्छाने जो, वज्रपुच्छाचे दोन अर्थ होणार, वज्रपुच्छ म्हणजे वज्रासारख कठीण पुच्छ मग ते राऊंड कसं फिरू शकतं जर एवढ कडक आहे तर, तरी फिरत.

म्हणजे वज्रा सारख असून ही ते फेरे मारत, तर वज्र पुच्छ म्हणजे टोक फक्त, पुच्छाच फक्त टोक त्याने सुद्धा ब्रह्मांडा भोवती वेढे मारायला सुरुवात केले, तयासी तुळणा कुठे. म्हणजे त्याच्याकडे अशी क्रमबद्धता आहे, की ब्रह्मांडाचा जो काही क्रम आहे म्हणजे आपण काय म्हणतो की युनिव्हर्स कसं आहे, ब्रह्मांड कसं आहे? अनंत कोटी ब्रह्मांड आहेत त्या सर्व ब्रह्मांडा भोवती तो वेढे घालू शकतो.

कुठला तारा कुठल्या स्टेजमध्ये आहे काही ह्याची पर्वा न करता तो सगळ्यांवर मात करून वेढे घालू शकतो अस त्याच पुच्छ आहे फक्त, आलं लक्षामध्ये.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘क्रमबध्दता - भाग १ (Sequence - Part 1)' बाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥