साईनिवास होळी पौर्णिमा शताब्दी उत्सव

 साईनिवास

अनेक साईभक्तांसाठी श्री साईसत्‌चरित हा ग्रंथ अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अनेक श्र्द्धावान या अपौरुषेय ग्रंथाचे नियमीत पारायण करतात. हा ग्रंथ ज्या वास्तुत लिहीला गेला ती वास्तु म्हणजेच श्री साईसत्‌चरितकार श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर (हेमाडपंत) यांचे वांद्रे येथील निवासस्थान - साईनिवास.

श्रीसाईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात आपण साईनिवास येथे १९१७ साली श्री साईनाथांच्या तसबीरीचे झालेले आगमन व तेव्हापासून सुरु झालेल्या होळी पौर्णिमा उत्सवाची कथा वाचतो. हेमाडपंत श्री साईसत्‌चरितामधील ४०व्या अध्यायात म्हणतात,

" तैंपासाव हा काळवर प्रत्येक होळीस ही तसबीर

     करवूनि घेई हे शिष्टाचार अष्टोपचार पूजेसह ॥१५९॥"

त्या वर्षापासून दर वर्षी हा उत्सव येथे भक्तिमय वातावरणात साजरा होत असतो. या वास्तुचे व येथे साजरा होणार्‍या होळी पौर्णिमा उत्सवाचे व तेथील श्री साईनाथांच्या तसबीरीचे महत्व ’साईनिवास’ या डॉक्युमेंट्रीमध्ये बघायला मिळते; त्याचप्रमाणे सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंचा साईनिवासशी असलेला जिव्हाळ्याचा संबंधही श्री. अप्पासाहेब आपल्याला त्यात विशद करतात.

साईनिवास - Holi Utsav

दरवर्षी होळी पौर्णिमेआधी साईनिवासमध्ये श्री साईसत्‌चरिताचे पारायण होते. यावर्षीही ९ मार्च रोजी पारायण सुरु होईल. पहिल्या दिवशी २६ अध्याय व दुसर्‍या दिवशी २६ अध्यायाचे पठण होईल. ५३व्या अध्यायाचे म्हणजेच अवतरणीकेचे पठण ११ मार्च रोजी पहाटे केले जाईल. होळी पौर्णिमा या उत्सवास यावर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत व यानिमित्त एका विशेष पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्‍गुरु बापूंच्या सांगण्यानुसार ११ मार्च २०१७ रोजी म्हणजेच होळी पौर्णिमा उत्सवाच्या आदल्या दिवशी सकाळी ८:०० ते रात्रौ ८:०० या वेळेत ’ कृपासिंधू श्री साईनाथाय नमः’ या जपाचे १,००,००८ वेळा पठण करण्यात येईल. हे पठण चालू असताना श्री. अप्पासाहेब दाभोलकर (सद्यपिपादादा) व कुटुंबीय श्री साईनाथांच्या "त्या" तसबीरीवर तुळशीपत्र व बिल्वपत्र अर्पण करतील. सर्व श्रद्धावान या पठणात सहभागी होऊ शकतील.

या शताब्दी उत्सवानिमीत्त शनिवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१७ रोजी श्री साईसत्‌चरितामधील ४० व्या अध्यायाचे १०८ वेळा पठण झाले. पठणासाठी ९ श्री साईसत्‌चरिताचे ग्रंथ मांडले होते. तसेच १२ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीपंचमुखहनुमत्कवचाचे १०८ वेळा व १९ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीशिवपंचाक्षरी स्तोत्राचे १०८ वेळा पठण केले गेले.

१२ मार्च २०१७ रोजी होळी पौर्णिमा उत्सवात होलीकामातेचे दुपारी १२:०० वाजता विधिवत पूजन होऊन होळी प्रज्वलीत केली जाईल. सर्व श्रद्धावान श्री साईनिवास येथे दर्शनाचा लाभ घेऊ शकतील.

साईनिवास - Holi Utsav

 हिन्दी