परमपूज्य बापूंना सद्गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्ट, औदुंबरद्वारे दिले गेले सन्मानपत्र( Sadguru Aniruddha Bapu was given a honorary letter by Sadguru Narayanand Tirth Seva trust, Audumber)

Sadguru Aniruddha Bapu was given a honorary letter by Sadguru Narayanand Tirth Seva trust, Audumber

एप्रिल-मे महिन्यात बापूंचा सांगली दौरा झाला. ह्या दौर्‍या दरम्यान १ मे २०१३ रोजी बापूंनी श्रीक्षेत्र औदुंबर येथे श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेतले. त्यानंतर औदुंबरमध्येच असलेले सद्गुरुनारायणानन्दतीर्थ सेवा ट्रस्टच्या http://narayanswami.org/english/audumber_mandal.html आमंत्रणाचा मान राखून त्यांनी ट्रस्ट तर्फे चालविल्या जाणार्‍या आश्रमाला भेट दिली. येथे ट्रस्टचे मठाधीपति व प्रधानविश्वस्त श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री यांनी बापूंचे सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन स्वागत केले.

श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री यांची माहिती: श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री हे सद्गुरु स्वामी नारायणानंद तीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबर येथील मठाधीपति असून त्या मठाचे प्रधानविश्वस्त ही आहेत. ’न्यायविद्वान, ’न्यायचुडामणी’, ’न्यायवेदांतचार्य’अशा अनेक उपाधी त्यांना प्रदान केलेल्या असून ते स्वत: संस्कृत व तत्वज्ञानामध्ये (philosophy) एम.ए. आहेत. गेली २५ वर्षं आश्रमाचे गौरवस्थान व गौरवाध्यक्ष म्हणून ते सेवा करीत आहेत. त्याचप्रमाणे आश्रमात विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

.

सन्मानपत्र
सन्मानपत्र

 

परमपूज्य बापूंना ट्रस्टद्वारे दिल्या गेलेल्या सन्मानपत्राचा अर्थ मराठीत असा आहे.

नमो भगवते दत्तात्रेयाय । दिव्य भगवान श्रीदत्तात्रेयांच्या सान्निध्यात, श्रीक्षेत्र औदुम्बर येथे, सद्‌गुरु नारायणानन्दतीर्थस्वामी गुरुंच्या सन्निध, आपल्या शुभ आगमनप्रसंगी हे सन्मानपत्र दिले जात आहे. (परमपूज्य बापूंच्या सन्मानार्थ सन्मानपत्रात म्हटलं आहे की)

हे प्रचंड तेज:संपन्न, महान, समर्थ विभूते!

आपल्याकडून अखंडपणे, श्रद्धावानजनांच्या समाजासाठी, निग्रह-अनुग्रह-शक्तिद्वारे केले जात असलेले उद्धार कार्य, जनता जनार्दनाची सेवा, या भावनेने केले जात आहे. आपण मानवरुपाने भूतलावर अवतरून, अनिरुद्ध नामाने किर्तिमान झाला आहात. आम्हां देहधारी मानवांसाठी, आपले दर्शन होणे, हे त्रिकालांचा उद्धार करणारे आहे. श्रद्धावानांचे कल्याण करण्याच्या आपल्या कार्यक्षेत्रात, आपण ईश्वरी लीला, आणि अनेकविध गुणांनी शोभून दिसत आहात. आणि आपले दिगन्त यश. असेच सदैव आम्ही ऐकत रहावे.

अशा प्रकारच्या ईश्वरी रमणीय गुणगणांनी विभूषित असणार्‍या आपणास, ‘भक्तकामकल्पद्रुम’, या पदवीने सन्मानित करण्यात येत आहे, आणि मन:सामर्थ्यदाता परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या पूज्य चरणी, आम्ही गौरवपुरस्काराने विभूषित असे हे सन्मानपत्र, सदर अर्पण करत आहोत.

आपले सत्कृपाभिलाषी,

विश्‍वस्त मंडळ विकास जगदाळे सद्‍गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्ट दत्तक्षेत्र, औदुम्बर, जिल्हा सांगली, महाराष्ट्र

गौरवाध्यक्ष आत्माराम एन्‌. नाडकर्णी अ‍ॅटर्नी जनरल, सिनियर अ‍ॅडव्होकेट हायकोर्ट, गोवा

बुधवार दिनांक १ मे २०१३

Published at Mumbai, Maharashtra.