ऑनलाईन देणगी आता सर्वांसाठी उपलब्ध (Online donation available)

ता श्रीवर्धमान व्रताधिराज चालू आहे. व्रताच्या काळात श्रद्धावान तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी / उपासनेसाठी जात असतात. त्याचबरोबर सर्व उपासना केंद्रांवर जाणारे व न जाऊ शकणारे श्रद्धावान गुरुपौर्णिमा अथवा अनिरुद्ध पौर्णिमेस तरी सद्गुरुंच्या दर्शनास येत असतात. ह्या श्रद्धावानांना अशा उत्सवांच्या वेळी बापूंना काहीतरी देण्याची मनापासून इच्छा असते. पण सद्गुरु बापू तर वैयक्तिकरित्या कधीच कोणाकडून काहीही घेत नाहीत. ज्यांना कोणाला काही देण्याची इच्छा आहे, त्यांनी ते देणगीस्वरूपात संस्थेच्या उपक्रमांकरिता संस्थेकडे जमा करावे असे बापू नेहमी सांगत आले आहेत.

 श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाच्या प्रथम खंडात दानाचे महत्त्व सांगताना बापू लिहीतात,

"सर्व युगांमध्ये अनन्य आहे, दानाचा महिमा. कलियुगी दान हे सोपे धर्मसाधन आहे. आचारधर्मात दानच आहे सर्वश्रेष्ठ. दानाहून श्रेष्ठ खरेच काही नाही. स्वत:हून रक्तदान, नेत्रदान वगैरे अवयवदान करून जीवनदान करा. ज्ञानदान, धनदान, सेवादान करा. जेवढे शक्य आहे, तेवढे तरी करा दान. श्रीगुरुदत्त हा नित्यदाता आहे, म्हणूनच जो दान करतो, तो गुरुदत्तास प्रिय असतो."

- श्रीमद्पुरुषार्थ, सत्यप्रवेश, पान क्र. २४२

 श्रीसाईसच्चरित पण आम्हाला हेच सांगते,

"धनाचा जो करणें संचय | धर्म घडावा हाचि आशय |

परी क्षुल्लक काम आणि विषय | यांतचि अतिशय वेंचे तें |

धनापासाव धर्म घडे | धर्मापासाव ज्ञान जोडे |

स्वार्थ तरी तो परमार्थीं चढे | मना आतुडे समाधान |"

- श्रीसाईसच्चरित, अध्याय १४, ओवी क्र. ११३, ११४

ह्याच हेतूने अनेक श्रद्धावानांना संस्थेच्या नावाने देणगीमूल्य पाठवण्याची इच्छा असते. परंतु बाहेरगावी राहत असल्यामुळे किंवा केंद्रांवर येणे दरवेळी शक्य होत नसल्याने त्यांना हे दान करणे कठीण जाते. म्हणून अशा श्रद्धावानांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे श्रीअनिरुद्ध उपासना फाउंडेशन ह्या संस्थेने www.aniruddhafoundation.com ह्या आपल्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून "पेमेंट गेटवे" सुरु केला आहे. ह्या वेबसाइटला भेट देऊन, भारतामध्ये कुठल्याही भागात राहणारे इच्छुक श्रद्धावान ऑनलाइन डोनेशन करू शकतात. ह्यासाठी श्रद्धावानांकडे कुठल्याही भारतीय बॅंकेने देऊ केलेले डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड (व्हिसा, मास्टर कार्ड, डायनर्स कार्ड) असणे एवढेच आवश्यक आहे.

 मला सांगण्यास आनंद होतो की आजच्या घडीला संस्थेतर्फे ३ मोठ्या प्रकल्पांचे काम जोर धरू लागले आहे, ते प्रकल्प म्हणजे:

१) जुईनगर, नवी मुंबई येथे स्थापन होणारे भारतातील पहिले वहिले "इंस्टिट्युट ऑफ जेरिआट्रिक्स एण्ड रिसर्च सेंटर".

२) आळंदी नजिक स्थापन होणारे पहिले वहिले "अनिरुद्ध धाम".

३) कष्टकरी व गरीब शेतक-यांच्या लाभाकरिता कर्जत-कोठींबे नजीक गोविद्यापीठम येथे राबविण्यात येणारा "अनिरुद्धाज इंस्टिट्युट ऑफ ग्राम विकास" हा प्रकल्प.

 ह्या महत्त्वाच्या प्रकल्पांकरिता सर्व इच्छुक श्रद्धावान "पेमेंट गेटवे"चा वापर करून आपापल्या कुवतीनुसार संस्थेकडे देणगीमूल्य जमा करू शकतात. ऑनलाइन डोनेशनच्या सुविधेसाठी खाली दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे "पेमेंट गेटवे"चा वापर करावा.

१) श्रीअनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या www.aniruddhafoundation.com ह्या वेबसाइटवरील ‘Click here to Donate Online’ ह्या बटणावरती क्लिक करावे.

२) त्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसणार्‍या फॉर्मवरील माहिती भरुन ‘Donate Now’ ह्या बटणावरती क्लिक करावे. मात्र त्याआधी फॉर्ममधील "Name", "E-mail", "Mobile No." आणि "Donation amount" ही माहिती भरणे गरजेचे आहे.

३) त्यानंतर आलेल्या स्क्रीनवरती आपल्या डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डची माहिती भरावी. पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिस्टीमने तयार केलेली पावती आपण दिलेल्या ई-मेलवर संस्थेतर्फे पाठविण्यात येईल.

 तसेच श्रद्धावानांच्या सोईकरिता लवकरच संस्थेतर्फे "नेट बॅंकिंग"ची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहे.

 मला खात्री आहे की जास्तीतजास्त श्रद्धावान ह्या "पेमेंट गेटवे"चा लाभ घेतील, व आपल्यास शक्य आहे तेवढे दान करतील; करत राहतील.

 

"हरि ॐ"

"श्रीराम"

"अंबज्ञ"

[btn link="https://sadguruaniruddhabapu.com/online-donation-available-for-all//" color="orange"] हिंदी[/btn]