निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता (The Unavoidable Order of Nature)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत सांगितले.
तर सूर्य असणं आणि चंद्र असणं तर दोन्ही असणं म्हणजे काय? तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय? तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय? शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत? की बाबा ह्याचे प्राण गेले म्हणजे ह्याचे शरीर थंड पडलेल आहे हा निपचीत पडलाय, गार पडलय म्हणजे गेला. म्हणजे काय होत? की माणसाचे प्राण गेले त्या शरीरातले अग्नि निघून जातो. म्हणजे प्राण हा अग्नितत्त्वाशी संबंधित आहे पटल, ओ.के.
तर चंद्र जो आहे म्हणजे षोम शक्तीच प्रतिक आहे तो. हा अग्नितत्त्वाच किंवा अग्नितत्त्वाच प्राणतत्त्वाच प्रतिक सूर्य आहे तर चंद्र हे कशाच प्रतिक आहे षोमतत्त्वाच, अग्नितत्त्वाच प्राणतत्त्वाच आहे. हे म्हटल मी षोमतत्त्वाच म्हणजे सौम्यत्व बरोबर, सौम्य माईल्डनेस. सूर्य कसा आहे? सूर्य तेजपुंज आहे राईट, तो प्रखर पण आहे. तर चंद्र कायम काय चंद्र सूर्याचच प्रकाश घेतं आणि परावर्तीत करतो, बरोबर. परंतु ते कसं आहे? चंद्र किरण ऍज वेल ऍज चंद्र दोघे कसे आहेत? सौम्य आहेत आणि त्याबरोबर चंद्र काय दाखवतो? पंधरा दिवस वाढत जातो, पुढचे पंधरा दिवस कमी होतो परत वाढवतो.
म्हणजेच काय? निसर्गाची अनिवार क्रमबद्धता. अन अवॉयडेबल (unavoidable) जी आपण नाकारूच शकत नाही क्रमबद्धता निसर्गामध्ये आहे आणि तिच प्रतिक म्हणजे चंद्र, की कुठली ही गोष्ट क्रमाच्या शिवाय होऊच शकत नाही. तर आज पोर्णिमा झाली की लगेच उद्या अमावस्या आणि मग तिसर्या दिवशी तृतिया आणि मग मध्येच सप्तमी, मग मध्येच चतुर्थी असं होत का? नाही, पटतय. म्हणजे निर्गातील अटळ काय आहे क्रमबद्धता तिच प्रतिक कोण आहे? चंद्र.
जेव्हा प्राणतत्त्व हे सौम्यत्वाने म्हणजे धीरगंभीर पणे कार्य करतं आणि क्रमबद्धता जाणून कार्य करतं म्हणजे उचित दिशेने कार्य करत तेव्हाच विकास होऊ शकतो. म्हणून सूर्य आणि चंद्र हे दोन्ही एकत्र दाखवले जातात कशासाठी? की मनुष्याला सदैव त्याच्या जाणीवा ज्या आहेत त्या जीणीवा शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे हे सूर्य-चंद्राच एकत्रित प्रतिक.
आता आपण कुठपर्यंत आलो, सूर्य-चंद्राच एकत्रित प्रतिक म्हणजे काय? तर मनुष्याच्या स्वत:च्या जाणीवा अधिक प्रबळ आणि शुद्ध करण्यासाठीची चिन्ह, पटल.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥