न्हाऊ तुझिया प्रेमे (Nahu tuzhiya preme)

न्हाऊ तुझिया प्रेमेसद्‌गुरु गुणसंकिर्तनाचा महिमा अपार आहे. सद्‌गुरु अनिरुध्दांवरील श्रध्दावानांच्या प्रेमातुनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ व ज्येष्ठ श्रध्दावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्‌गुरुंचं गुणसंकिर्तन केलं आहे. श्रीकृष्णशास्‍त्री इनामदार, त्यांच्या पत्‍नी सुशिलाताई इनामदार, आद्यपिपा, साधनाताई, मीनावहिनी हे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ श्रध्दावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांच कोंदण लाभल आणि ह्यातून जन्म झाला ’ऎलतिरी मी पैलतिरी तू’, ’गाजतिया ढोल नी वाजतिया टाळ’, ’पिपासा’, ’वहिनी म्हणे’, ’पिपासा पसरली’, ’तुम बिन कौन सहारा’, ’बापू दाय ग्रेस’ अशा अनेक सीडीज्‌चा. परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या दिव्यत्वाची ओळख आपल्याला ह्या अभंगातून होत असते. श्रवणभक्ति हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तिमार्गावर स्थिर करत असते. अशा ह्या भक्तिरचनांचा आस्वाद प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी "न्हाऊ तुझिया प्रेमे" ह्या सत्संगाद्वारे सर्व श्रद्धावानांसाठी खास उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व श्रद्धावानांच्या सोयीकरता ह्या ’न भूतो न भविष्यती’ सत्संगाचे स्थळ व देणगीमूल्य लवकरच कळविले जाईल. केंद्र या कार्यक्रमासाठी बसेसची सोय करु शकतात. बसेसच्या पार्किंगची व्यवस्था सत्संगस्थळी करण्यात येईल.

ह्या सत्संगाची सुरुवात रविवार दि. २६ मे २०१३ रोजी सायंकाळी ४ वाजता परमपूज्य बापूंच्या आगमनाने होईल. ह्या भक्तिरसाच्या वर्षावात न्हाऊन निघताना परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई आणि परमपूज्य सुचितदादा हे स्वतः श्रद्धावानांसोबत असणार आहेत.