माझ्या ताईचा वाढदिवस (नंदाई चा वाढदिवस) ( My sister's birthday - Nandai's birthday )
नंदाईचा वाढदिवस - Nandai's birthday
उद्या, दिनांक १२ ऑगस्ट म्हणजेच आपल्या परम पूज्य नंदाईचा (माझ्या व सुचीतदादांच्या लाडक्या ताईचा) वाढदिवस आहे. गेल्या वर्षी आपण सर्वांनी तिचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता.
नंदाईचे वर्णन एका वाक्यात करावयाचे म्हटले तर "अनिरुद्धची शक्ती नंदा अवतरली जगती" ह्याच वाक्याने होऊ शकेल. खरंच तिच्या पूर्ण जीवनाचे सार ह्या एका वाक्यातच सामावलेले आहे. माझी नंदाई म्हणजेच माझ्या सदगुरूंची शक्ती आहे आणि ती मूर्तिमंत भाक्तीरूपिणी आहे.
ह्या अश्या माझ्या प्रेमळ आईला, माझ्या लाडक्या ताईला, वाढदिवसाच्या दिवशी काय भेट दिलेली अधिक आवडेल?
नक्कीच ह्या भक्तीरूपिणीला मी माझ्या सद्गुरुचरणी माझी भक्ती दृढ करत राहणे हेच आवडेल आणि हीच भेट तिला तिच्या प्रत्येक बाळाकडून मिळाल्यास ती अधिक आनंदीत होईल हा माझा विश्वास आहे. आपली बाळं त्यांच्या सद्गुरुचरणी कृतज्ञ राहिलेले तिला सदैव आवडेल. म्हणूनच मी उद्या नंदाईच्या वाढदिवसानिमित्त सदगुरू श्री अनिरुद्ध ऋणज्ञापक स्तोत्र पठण करणार आहे. माझ्याप्रमाणे सर्व श्रद्धावान बापूभक्त सुद्धा हे पठण करू शकतात.
हरि ॐ
हरि ॐ
॥“हरि ॐ”॥ ॥ श्रीराम”॥ ॥“अंबज्ञ”॥