तुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सांगितले.

तुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)

आता तुम्ही म्हणाल, बापू आम्ही faith ठेवायचा म्हणजे काय? विश्वास ठेवायचा म्हणजे काय? हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो! मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का? बरोबर? म्हणजे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमची भक्ती थोडीफार weak पडू शकते, तुमचं धैर्य खच्ची होऊ शकतं, ह्याची मला guarantee आहे बाळांनो. आणि म्हणून हा सगळा उपद्व्याप.

लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा स्वतःकडे एक मला सांगायचं की आजपासून सगळ्यांनी हे सोडून द्यायचं. आईला सांगा माझ्या डायरेक्ट. ती डायरेक्ट ऐकणार नाही? ऐकणार, प्रत्येकाची आई आहे ती. की आई, आमची श्रद्धा कमी पडते आहे. आमची सबूरी कमी पडते, आमचा विश्वास कमी पडतो, वाढव. Yes! श्रद्धासुद्धा मागा. Yes मिळेल. विश्वास मागा मिळेल. सबूरी मागा मिळेल, Yes. इतकं विशाल भांडार आहे माझ्या आईचं. सगळं, yes, आम्ही कमी पडतोय आमचा faith आम्हाला वाटतंय ना, वाढवू, कोण वाढवणार? ती बसली आहे वाढवायला.

‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥