महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो (The whole day of Mahashivaratri is considered as Pradosha Kaal)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात  ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले.

म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का? कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही. आणि म्हणूनच आपण प्रदोष समयाला शिवाचं पूजन करतो, त्यावर बेल वाहतो. बेल म्हणजे काय? तर दोन हात आणि एक मस्तक ह्यांचं ते चिन्ह आहे की देवा संपूर्ण कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या मधली संयुक्तिक करणारी रचना, ह्या सगळे सर्वस्व माझं मी तुला अर्पण करतो आहे, तुला पाहिजे ते बदल तू घडवून आण. आणि ते आम्हाला नकोसे वाटत असले तरी तेच फायदेशीर असतात.

लहानपणी आपल्याला कडू औषध आवडतं का? आताही आवडत नाही. फायद्याचं तेच असतं की नाही. तशीच ही गोष्ट असते. त्यासाठी आपल्याला शिवाला सांगावं लागतं, हे शिवा की तुला जे बदल घडवून आणायचे आहेत, आम्ही त्याच्यामध्ये जर तर घालणार नाही. दररोज प्रदोष समय असतो. आम्ही दररोज सांगितलं तर चांगलंच आहे. पण दररोज आम्हाला जमणार नाही, आणि मुख्य म्हणजे महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, आषाढी एकादशी, रामनवमी, गुरुपौर्णिमा ह्या दिवसांमध्ये या परमात्मातत्वाने आपली vibrations पूर्णपणे खुले आम मोकळी केलेली असतात. म्हणजे आमची capacity किती आहे, ते विचार न करता त्या दिवशी आम्हाला response केला जातो.

महाशिवरात्रीच्या दिवशी, म्हणाल बापू आम्ही संध्याकाळी नाही वाहिलं हो बेल पान, काळजी नको. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी हा संपूर्ण दिवस जो आहे ना, तो अख्खा दिवसच प्रदोष मानला आहे. जो पहिला प्रश्न केला महाशिवरात्र आहे, महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे काय? तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नाही, दिवस, म्हणजे अख्खा अहोरात्र आपण ज्याला म्हणतो, तो संपूर्ण पवित्र आहे. ज्या वेळेला तुम्ही बेल वहाल आणि देवाला सांगाल, you are welcome, तुझं स्वागत असू दे, माझ्यामध्ये जे बदल तुला घडवून आणायचे आहेत, ते बिन्धास्तपणे घडवून आण.

महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥