जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय दुर्गे...

ह्या गुरुवारी, दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात आपल्यातील एक अतिशय महत्त्वाच्या algorithm बद्दल सांगितले. ज्यामुळे मोठी-आई म्हणेच चंडिकामाता तिच्या पुत्रासहित म्हणजे परमात्म्यासहित, प्रत्येक क्षणाला केवळ भावरुपाने नाही तर जीवंतपणे आमच्या जीनवामध्ये असेल. ह्यामुळे आपल्या प्रत्येकाला चंडिकामातेने व परमात्म्याने जे व्यक्तित्व ( individuality ) दिलेलं आहे, जो आपल्यातील bestest गुण आहे तो गुण आपल्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल. 
 
प्रवचन संपल्यावर बापूंनी सर्व श्रध्दावानांना एक दुर्लभ अशी भेट दिली. बापूंनी स्वत: "जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय दुर्गे..." हा गजर घेतला. ह्या गजरात सर्व श्रध्दावान आपले देहभान हरवून तल्लीन झाले होते. या गजरात सामील व्हायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल, चला तर मग गजरात सामील होऊया.

ll हरि ॐ ll
ll श्रीराम ll
ll मी अंबज्ञ आहे ll