Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata - 2

क्रमशील विकासाचा मार्ग (The Path of sequential development) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ लक्ष्मी क्रमशीलतेच्या मार्गाने येते ’ याबाबत सांगितले.

 

लक्ष्मी अनपगामिनी असते Aniruddha Bapu
 लक्ष्मी अनपगामिनी असते - 2 (Lakshmi is Anapagamini - 2) - Aniruddha Bapu

श्रेष्ठ ब्रह्मवादिनी लोपामुद्रेने लक्ष्मी मातेला आवाहन करण्यास जातवेदाला (त्रिविक्रमाला) सांगितले आहे कारण फक्त तोच लक्ष्मी मातेला किंवा महालक्ष्मीला आणू शकतो. तो या लक्ष्मी मातेला आणणार आहे, पण आम्हाला माहीत पाहिजे की लक्ष्मी कोणत्या मार्गाने येते? तर ती क्रमशीलतेच्या मार्गाने येते. कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच क्रम आहे. त्यामुळे क्रम सोडून रांग सोडून कोणतीही गोष्ट अननॅचरलच आहे. ही त्रिविक्रमाची माता आहे. ज्या तिच्या या पुत्राच्या नावातच क्रम, विक्रम आणि त्रिविक्रम आहे आम्हाला क्रमानेच जायची इच्छा पाहिजे. नाहीतर तिची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच अवदसा येईल, जी तात्‍पुरता पैसा देते, त्याबरोबर अशांती, दु:ख, अनेकांचे शाप आणते. जीवनाचा समतोल जातो, प्रेम निघून जाते, आपली माणसे दूर होतात. कोणी उरत नाही आणि जी सुखाची साधने आलेली आहेत, त्यांचा उपभोगही घेता येत नाही. एखादा माणूस केवळ श्रीमंत असल्याने त्याला मत्सराने त्याने वाईट मार्गाने पैसा मिळविला असे म्हणायचे नसतं. त्याने प्रामाणिकपणे पैसा मिळविला असेल, तर तुम्ही त्या लक्ष्मी मातेचा अपमान करत आहात. असे कधीही करू नका. मग अपमान करणार्‍यावर लक्ष्मी मातेचा कोप होतो. कोणी पैसा कमावला म्हनून त्याला मत्सराने कुणी दोष देत राहील तर मग लक्ष्मी त्या व्यक्तीच्या जीवनात रहात नाही. लक्ष्मी मातेला दिलेला दोष कधीही महाविष्णूला आवडणार नाही. महाविष्णू जेथे नाही तेथे ही लक्ष्मी ही राहणार नाही. क्रमशील विकासाच्या मार्गाबद्दल आपल्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

लक्ष्मी, अन्नपूर्णा आणि सरस्वती ही आह्लादिनीची रूपे आहेत (Lakshmi, Annapurna and Saraswati are the manifestations of Aahladini) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५च्या मराठी प्रवचनात ‘ लक्ष्मी , अन्नपूर्णा आणि सरस्वती ही आह्लादिनीची रूपे आहेत’ याबाबत सांगितले.

‘अन्नमयं मन:’ हा सिद्धान्त छांदोग्य उपनिषदात दिलेला आहे आणि आपण याबाबत आपल्या ग्रंथात उद्‌धृत केले आहे. मन: अन्नमयं म्हणजे अन्नातून मन बनते. चांगल्या अन्नातून चांगले मन म्हणजे बळकट मन बनते. बळकट मन तर बळकट शरीर.   मनापासून सांगतो की लक्ष्मी हीच अन्नपूर्णा आहे, ती सरस्वती आहे आणि या तिघिंचं अस्तित्व एकत्रच आहे. म्हणूनच क्रमवार जाण आवश्यक आहे. अगदी वजन कमी करण्यासाठीही लगेच वजन कमी होणे शक्य नसते. पण आम्हाला कमी श्रमात जास्त फायदा झाला पाहिजे असे वाटत असते. मग आपण कोणी सांगितले की या गोळ्या घेतल्या की आठवड्यात ८ किलो वजन कमी झाले की मग आपण लगेच त्या घ्यायला तयार असतो. परंतु अगदी जराही जेवला नाहीत, फक्त पाण्यावर राहिलात, तरीसुद्धा आठ दिवसांत जास्तीत जास्त साडे चार किलो वजन कमी होऊ शकते. पण त्याचे परिणामही खूप भयंकर होतात. हवे असल्यास नेटवर जाऊ बघा की स्टार्व्हिंगचे काय परिणाम होतात ते. त्यामुळे वजनही कमी करावयाचे असेल तर तेही क्रमाक्रमाने व हळूहळूच कमी होणे चांगले, असे आपल्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

लक्ष्मी मातेची कृपा ही प्रत्येकाला हवी असते (Everyone needs Mata Lakshmi's grace) - Aniruddha Bapu ‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘माता लक्ष्मी माते ची कृपा ही प्रत्येकाला हवी असते’ याबाबत सांगितले. माणसाला त्याच्या आयुष्यात भक्तमाता लक्ष्मी हवी असते. प्रत्येकाला सधन व्हायचेच असते. अधिक पैसा मिळविणे चांगलेच आहे, पण तो क्रमाने मिळवा, चांगल्या मार्गाने मिळवा. जेवढा आपली मोठी आई देईल तेवढाच आपल्याला उचित आहे हे मात्र ध्यानात ठेवा. तरीही जास्त मिळण्याची इच्छा ठेवा, त्यात चुकीचे काहीच नाही. श्रमांची तयारी ठेवा, क्रमाने पुढे जायची तयारी ठेवा. कमी श्रमामध्ये जास्त पैसे मिळविल्याने कुणाचेच भले झालेले नाही, नसतेच कधी शक्य. आपण कोणाला फसवले तर एकवेळ त्या व्यक्तीला कळणार नाही परंतु त्या मोठ्या आईला प्रत्येक गोष्ट बरोबर कळत असते. सगळ्यांच्या मनातील प्रवाह शॆवटी येऊन त्या परमात्याच्या मनालाच येऊन मिळतात. म्हणून सांगतो ईश्वराचा धाक बाळगाए. आपल्या लाडक्या सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी या संदर्भात जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥