हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata) - Aniruddha Bapu

लक्ष्मी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारी आहे (Lakshmi shines like the moon) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ लक्ष्मी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारी आहे ’ याबाबत सांगितले.

 

हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata) - Aniruddha Bapu Marathi‬ Discourse 04 June 2015
हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर
(Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi Mata) - Aniruddha Bapu

 चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो‍ म आवह। ह्या भारतीय संस्कृतीचा एक उत्कृष्ट गुणधर्म आहे की कोणतीही गोष्ट करायची ती रसिकतेने, सहजतेने, साधेपणाने, सुंदरतेने, मधुरतेने आणि तरीही दिखाऊ नाही, टाकाऊ नाही, नुसती सजवण्यासाठी नाही, तर अर्थगर्भ असणारी कार्यप्रवण करणारी आहे. प्रथम ब्रह्मवादिनी लोपामुद्राने लिहिलेल्या या ‘चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो‍ म आवह’ याचा साधा अर्थ म्हणजे लक्ष्मी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारी आहे आणि तिचा प्रकाश हा सूर्यासारखा तेजस्वी नसून सौम्य आहे. हो, ती सौम्यच आहे. तिच्या मनात तिच्या पुत्रांविषयी प्रेमच आहे. आम्हाला लक्ष्मी (वैभव, भरभराट, धनसमृद्धी) अनपगामिनी म्हणजे आमच्याकडून कधीही दूर न जाणारी हवी असते. हिचा सुंदर गुणधर्म म्हणजे ती ‘चंद्रा’ आहे. लोपामुद्रा सांगते की हे जातवेदा, ही लक्ष्मी सतत श्रद्धावानाच्या सोबत रहावी, असे आपल्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर (Oh Jaataveda, Invoke that Anapagamini Lakshmi) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर’, याबाबत सांगितले.

लक्ष्मी चंद्राप्रमाणे असते. आम्हाला मात्र लक्ष्मी कशी हवी असते? चुटकीसरशी सर्वकाही आमच्या मनाप्रमाणे करणारी. आदिमाता ज्याप्रमाणे त्या चंद्राला पूर्णत्वाला नेते. अमावस्येमध्येसुद्धा चंद्र जागच्या जागी आहेच, फक्त मनुष्यासाठी त्याचा कुठला भाग दाखवायचा व कुठला भाग दाखवायचा नाही ह्यानुसार तो सर्वांना दिसत नसतो. मात्र चंद्र असतोच आकाशात, तो काही नाहीसा होत नाही. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतातच, पण या चढ-उतारात धक्के नाही बसत. पण आम्हाला मात्र सुख धक्क्याने हवे असते, पटकन हवे असते म्हणजे लक्ष्मी पटकन हवी असते आणि तीही अनपगामिनी लक्ष्मी.

मानव निसर्गाच्या नियमाच्या बाहेर जाऊन लक्ष्मी मिळवायला बघतो, मात्र अशा प्रज्ञापराधामुळे त्याच्या जीवनात येते ती लक्ष्मी मातेची मोठी बहीण अलक्ष्मी. लक्ष्मी कधी एकदम जात नाही ती एक एक संकेत देत राहते पण त्या धक्क्यांनी आपण सावध झालो नाही तर मग आपल्या जीवनात अमावस्या येणारच. त्यासाठीच ‘हे जातवेदा, त्या अनपगामिनी लक्ष्मी मातेला आवाहन कर’, हे श्रीसूक्तात सांगितले आहे. याबाबत आपल्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ऋताचा मार्ग अनुसरा (Follow the path of eternal law) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ४ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ऋताचा मार्ग अनुसरा’ याबाबत सांगितले.

कष्टाचा पैसा हा कष्टाचा पैसाच असतो. तोच आपल्याला लाभदायक ठरतो. चिटींग करून मिळविलेला पैसा कधीच कामी येत नाही. कमी श्रमामध्ये जास्त पैसा ही संकल्पना सोडून द्या असे आपल्या बापूंनी साईचरित्रातील दामुअण्णा कासार यांचे उदाहरण देउन समजाविले.

चंद्रां या शब्दाचा मूळ अर्थ आहे ‘ऋतत्व’ म्हणजे विश्वाचे, सृष्टीचे नियम. सृष्टीमध्ये जे जे काही चांगले, ज्या चांगल्या मार्गाने होते, ते त्या मार्गाचे नियम म्हणजेच ‘ऋत’ म्हणजेच चंद्र. चंद्रां म्हणजे जी ऋत झालेली आहे ती. माझा क्रांतीवर विश्वास नाही तर परमेश्वरी नियमांनुसार होणार्‍या विकासावर विश्वास आहे. असे एका क्षणात कधीच कुठलेही बदल होणे शक्य नसते. बदल करण्यासाठी काही काळ हा जावाच लागतो. लक्षात ठेवा, लक्ष्मी हवी आहे ना, पण ती चंद्र मार्गानेच (हळू हळू) मिळणारी आहे. मानवाने ऋताचा मार्ग अनुसरायला हवा, असे आपल्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥