मी त्रिविक्रमाचे लाडके अपत्य आहे (I am the dear child of Trivikram) - Aniruddha Bapu
I am the dear child of Trivikram
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘प्रत्येक श्रद्धावानाने हा विश्वास बाळगावा की तो त्रिविक्रमाचे लाडके अपत्य आहे’, याबाबत सांगितले. लोपामुद्राने श्रीसूक्तम्ची(Shree Suktam) रचना केली आहे. ही लोपामुद्रा मानवाची हितचिंतक आहे. श्रेष्ठ ब्रह्मवादिनी आहे. तिने त्रिविक्रम, हरिहर शब्द न वापरता जातवेद हा शब्द वापरला. त्या जातवेदालाच आवाहन करता येते कारण हा जातवेदच महालक्ष्मीला (Mahalaxmi) आपल्या घरामध्ये, मनामध्ये (mind), देहामधे (body), स्थळामध्ये, कुळामध्ये घेऊन येऊ शकतो. पण कधी जेव्हा आपण जातवेदाला जाणू तेव्हाच. आजपासून निश्चय करायचा की, स्वक्स्तिक्षेम सवांद करताना तो जातवेद त्रिविक्रम आणि त्याची आई आदिमाता सर्व जाणतच आहेत. पण मी त्यांचा लाडका पुत्र किंवा नातू आणि मी त्याची लाडकी कन्या किंवा नात आहे हे लक्षात ठेवायचे. यात जे लाडकेपण आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. त्यात चुकायचे नाही, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥