यशस्वी रक्तदान शिबीर (Grand Success Of Blood Donation Camp)
दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’ (Dilasa Medical Trust), ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ (Aniruddha's Academy of Disaster Management) आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ (Shree Aniruddha Upasana Foundation) या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिराआधी सर्वांना खात्री होती की आपण १ लाखाचा टप्पा नक्कीच पार करणार. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध उपासना केंद्रांना केलेल्या आवाहनाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
या विविध अनिरुद्ध उपासना केंद्रामार्फत आणि श्रीहरिगुरूग्राम येथे झालेल्या रक्तदानातून जमा झालेल्या रक्तबाटल्यांची एकत्रितरित्या मोजणी घेणे आवश्यक होती. त्या रक्तबाटल्या मोजण्यासाठी “Statistics” टीममधील श्रद्धावान कार्यकर्ता सेवकांनी अथक प्रयास केले. त्यांच्या प्रयासातून मिळालेली संख्या सर्व श्रद्धावानांना लगेच अपडेट व्हावी यासाठी माझ्या ब्लॉगवर “IT” टीममधील कार्यकर्ता सेवकांमार्फत १२ एप्रिल २०१५ रोजी ‘Total Blood Donation Count Since Year 1999’ नावाने काऊंटर सुरू करण्यात आला होता. या काऊंटरला सर्व श्रद्धावान मित्रांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अक्षरश: प्रत्येक जण त्या काऊंटरवर डोळे लावून बसले होते. एक लाख बाटल्यांचा पल्ला जेव्हा पार केला तेव्हा सर्व श्रद्धावान मित्रांकडून एकमेकांना खूप आनंदाने शुभेच्छा आणि अंबज्ञ चे मेसेज येत होते.
रक्तदान शिबिर आणि त्या रक्तदान शिबिरात जमा झालेल्या रक्त बाटल्यांची आकडेवारी सांगणारा हा काऊंटर आता मी ब्लॉग वरून काढून घेत आहे (डिसकंटिन्यू करत आहे). परंतु या काऊंटरबाबत श्रद्धावानांनी दाखविलेल्या उदंड प्रतिसादामुळे पुढल्या वर्षी पुन्हा हा काऊंटर किंवा त्यापेक्षा अजून असेच चांगले काही देण्याचा प्रयास असेल. याबाबत आपणा सर्व श्रद्धावानांना काही सूचना असल्यास नक्की पाठवू शकता.
रक्तबाटल्या मोजण्यासाठी असलेल्या “Statistics” टीममधील आणि ब्लॉगवरील काऊंटरसाठी असलेल्या “IT” टीममधील कार्यकर्ता सेवकांनी केलेल्या या विशेष सेवेचे आपण सर्व श्रद्धावानांनी अभिनंदन करूया. ज्याच्यामुळे आपल्यापर्यंत “ Latest count” वेळोवेळी पोहोचत होता.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll