भगवंतच आमचे गन्तव्यस्थान आहे (God Is Our Final Destination) समुद्राचे पाणी खारट आहे हे एकदा कळल्यावर माणूस दर वेळी त्याची परीक्षा पाहत नाही, ते तपासून पाहत नाही. रोजच्या रस्त्यावरून चालताना माणूस व्यवहारातील गोष्टींबद्दल अनभिज्ञ असतो, त्याचा विश्वास असतो की हा रस्ता त्याला त्याच्या गन्तव्यस्थानी घेऊन जाणारच आहे. पण सर्वांचे एकमेव गन्तव्यस्थान असणार्या भगवंतावर मात्र माणूस विश्वास ठेवायला तयार नसतो. सर्वांचे एकमेव गन्तव्यस्थान भगवंतच आहे, याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या ०४ डिसेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥