श्रीमूलार्कगणेश स्थापना( Foundation of Shree Moolark Ganesh)
श्रीमूलार्कगणेश स्थापना...
आज, सोमवारी श्रीमूलार्कगणेशाच्या स्थापनेच्या आधी आवश्यक असलेल्या विधींची व पुरश्चरणाची पूर्तता होईल. त्यानंतर बापू (अनिरुद्धसिंह), त्यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार श्रीमूलार्कगणेशाची स्थापना करतील. बापू (अनिरुद्धसिंह) कुठल्या वेळेला स्थापना करतील, हे काहीच निश्चित नाही. यास्तव आपण सर्व श्रद्धावान या स्थापनेची वाट पाहूया. ज्या क्षणी श्रीमूलार्कगणेशाची स्थापना होईल, त्यानंतर त्वरीत श्रीमूलार्कगणेशाचा फोटो या ब्लॉगवरून आणि फेसबूकवरून श्रद्धावानांपर्यंत पोचविला जाईल. स्थापनेच्या वेळेस या श्रीमूलार्कगणेशाचे नाव बापू (अनिरुद्धसिंह) निश्चित करतील. स्थापना झाल्यानंतर श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्च्या नित्य दर्शनाच्या वेळेस सर्व श्रद्धावानांसाठी श्रीमूलार्कगणेशाचे दर्शन खुले असेल. तरी आपण सर्व श्रध्दावान श्रीमूलार्कगणेशाची वाट बघत राहुया...