विश्वास आणि जबाबदारी (Faith and Responsibility)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सांगितले.

 

विश्वास ठेवा! विश्वास ठेवा कि तुम्ही विश्वास ठेवलात कि तो सगळं करु शकतो, सगळं करु शकतो. कुठल्या मार्गाने करेल हे तुम्हाला माहित नाही. त्यांचे मार्ग त्यांना माहिती असतील. Why should we bother for it. मी का म्हणून काळजी करायची. अगदी वादळात सापडला आहात. चारही बाजूंनी समजा चारही समुद्र सगळ्या जगाचे समुद्र तुमच्या अंगावर चालून येत आहेत आणि तुम्हाला पोहता सुद्धा साधं येत नाही आहे, लाकडची होडी काय साधी गवताची काडी पण तुमच्या बाजूला नाही आहे. अशा टाईमाला पण विश्वास ठेवा.

असे का समुद्र किती मोठा, पण हे सगळे समुद्र आमच्या आईच्या शंखात मावलेले होते. आपण वाचली आहे तिची कथा. तिच्या शंखामध्ये सगळे समुद्र मावलेले होते. So what is the big problem? ती इकडे सुद्धा तिला पाहिजे ते करु शकते. बरोबर? Yes she can. नक्की. कसं करतील? त्याच्या मात्र रचना तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही करु नका. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा.

आज मला तुम्हाला एक महत्वाचं वाक्य सांगायचं आहे कि भक्ति करतांना आणि व्यवहार करतांना थोडे वेगळे वागा. काय सांगतोय? भक्ति करतांना आणि व्यवहार करतांना मी तुम्हाला वेगळं वागायला सांगतोय. मी संत नाही आहे. मी योद्धा आहे आणि मी योद्धाच्याच मार्गाने जाणार. भक्ति करतांना अशी भक्ति करा कि त्या परमेश्वरी समोर, आपल्या परमेश्वरासमोर आपल्या परमात्म्या समोर उभं राहून सांगायचं प्रेमाने, I am just nothing. मी कोणंच नाही आहे. मी जे आहे ते सगळंकाही आहे ते तुझ्यामुळे आहे. तूच मला घडवणार आहेस, तूच मला बनवणार आहेस, सगळं तुझ्यावरच dependent आहे. सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे आई, हे देवा सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे.

आणि काम करतांना आधी असं सांगा, आई मी आता कामाला लागतोय, आणि मग असा विचार करा, कि हे काम पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे, म्हणजे स्वतःवर. समजलं? कि भक्ति करतांना मी अशी भक्ति करेल कि हे परमेश्वरा, हे परमेश्वरी, हे परमात्म्या, हे सद्गुरु, सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे. तू करशील तसंच सगळं होणार. अगदी माझा व्यवहार सुद्धा. आणि मग कामाला लागल्या नंतर मात्र, समजा तुम्ही स्टूल बनवता आहात, तुम्ही भिंत बांधता आहेत, तुम्ही चित्र काढता आहेत, तुम्ही जात्यावर जातहेत, तुम्ही स्वयंपाक करताहेत, जे काही करता आहेत ते, सगळं माझ्यावर अवलंबून आहे.

पण मी माझ्या आईला सांगितलेलं आहे, मी माझ्या बाबांना सांगितलेलं आहे, मी माझ्या आजीला सांगितलेलं आहे, काय कि सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे. पण काम करतांना मात्र अशा रितीने करायचं कि everything depends on me. माझ्यावरच सगळं अवलंबून आहे. आणि मग बघा, तुमच्या कामातली तुमची अक्कल अधिक वाढेल. तुमच्या कामातली तुमची गती अधिक वाढेल, तुमच्या कामातली तुमची क्षमता अधिक वाढेल.

‘विश्वास आणि जबाबदारी’ याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥