प्रश्न विचारणे थांबवू नका (Don't Stop Questioning)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘प्रश्न विचारणे थांबवू नका’ याबाबत सांगितले.

आम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की बापू! परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून? जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर? हळूहळू करत माकडं उड्या मारता मारता, सरळ चालायला लागलं, आणि मग एक लाख वर्षामध्ये त्याचा माणूस झाला, किंवा दोन लाख वर्षामध्ये झाला असेल. पण त्याला exactly कुठल्या क्षणी परमेश्वर कळला? त्याला परमेश्वराने स्वतः येऊन सांगितलं का, मी परमेश्वर आहे, मी असा असा राहतो, आणि मग बाकीचं सगळं सुरु झालं नंतर? मग त्याच्या आधी काय झालं होतं?

म्हणजे माकडाचा माणूस होण्यामागे काय नक्की गोष्ट आहे, बरोबर? म्हणजे माणसाला देवाचं अस्तित्व समजलं कसं? की त्याने आपलं स्वतःच काहीतरी कल्पना केल्या आणि त्या कल्पना, कोणातरी चतुर माणसाच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली आणि त्याच्या गळ्यात उतरवली. जगात सगळीकडे परमेश्वराची कल्पना आहे. मग लबाड लोकं सगळीकडेच असतात बापू? हुशार लोकं सगळीकडेच असतात. बरोबर परमेश्वर माणसाला समजला कसा? कुठेही असं परमेश्वराने स्वतःहून सांगितलं असेल की असा असा मी आहे, कधी सांगितलं ते? मग रेकॉर्डेड का नाही? पण माकडाचा जेव्हा माणूस झाला, बरोबर? एकाच ठिकाणी झाला का तो? वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झाला असेल तर त्या माणसाला कोणी सांगितलं? की प्रत्येक समूहाला वेगवेगळा देव भेटला. की एकच देव वेगळ्या ठिकाणी जाऊन भेटला? आणि एवढी मोठी दिव्य घटना घडली तर रेकॉर्ड कसा नाही?

आम्हाला प्रश्न पडतो, किंबहुना पडायला पाहिजे. बरोबर? नक्की अशी वेळ कुठली? की जिकडे माणसाला जाणीव झाली की माकडाचा माणूस झाला. माकडाचा माणूस झाल्यावर त्याला किती दिवसांनी कळलं की देव आहे? मग तेव्हा कर्मस्वातंत्र्य होतं की नव्हतं? कर्मस्वातंत्र्याचा नियम कधीपासून लागू झाला? हे सगळे प्रश्न मनात उद्भवतात. उद्भवायला पाहिजे. हे प्रश्न उद्भवले नाही तर आम्हाला देव समजू शकणार नाही.

हे प्रश्न उद्भवणं म्हणजे शंका काढणं नव्हे. तर आपला विषय अधिक समजवून घेणं. कुशंका काढणारे कुशंका काढतच राहतील, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण आपल्याला ज्या difficulties येतात, अडचणी वाटतात, त्या कशासाठी असतात, त्या विषयातलं अधिक ज्ञान संपादन करण्यासाठी, तो विषय अधिक समजण्यासाठी, अधिक आपलासा करण्यासाठी.

प्रश्न विचारणे थांबवू नका, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥