जाणीव - भाग २ (Consciousness - Part 2)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले.

Consciousness-Part-2

बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का? बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे? शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे? गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती गोष्टी आम्ही पाळतो? नाही.

शताक्षीप्रसादम्‌बद्दल हेही सांगितलंय काही जणांना लसूण सुट होणार नाही त्याच्या एवजी त्यांनी आलं घ्यावं, बरोबर. पण आम्ही पाळतो का? पहिले सहा महिने उत्साहाने केलं किंवा सहा दिवस किंवा सहा तास केलं असेल, मला माहित नाही, त्यानंतर आम्ही विसरलो म्हणजे आमची जाणीव, ह्याचा अर्थ एका अमिबा पेक्षा सुद्धा खालच्या दर्जाची आहे, हे सत्य मनुष्याने स्वीकारायला हवं. मनुष्याचा ब्रेन एवढा सुपिरिअर आहे, ह्याला ब्रेन म्हणजे ह्याचं न्युकलिअस, ह्याचं केंद्र तो लहान, छोटं आहे ते, तो आपल्या ब्रेनच्या पुढे काहीच नाही.

आपली प्रत्येक पेशी ह्या अमिबापेक्षा जास्त इंटेलिजन्ट आहे, जास्त बुद्धीमान आहे मेंदूची. तरीदेखील आमच्या मधील जाणीव आम्हाला चांगल काय वाईट काय ओळखायला मदत करत नाही, किंबहुना आम्ही ती जाणीव वापरत नाही म्हणजे जाणीव आम्ही धुडकावून लावतो, पटत. असं का होत? कारण मनुष्याला बुद्धी आहे म्हणून, त्या प्राण्याला बुद्धी नाही आहे. आलं लक्षामध्ये. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥