जाणीव (Consciousness)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव (Consciousness)’ याबाबत सांगितले.
हा जो देव म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे नक्की काय? तर साधी गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माणसाला समजला कसा? हे बघायचं झालं, तर आपले वेद अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात, की देव माणसामध्ये कसा पसरला? म्हणजे काय? तर परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची जाणीव माणसाला, कशी झाली? काय वाक्य लक्षात घ्या, परमेश्वराची जाणीव किंबहुना परमेश्वराच्या आहेपणची जाणीव, म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव, माणसाला मनुष्य समाजामध्ये, कशी पसरली? माणसाला जाणीव कशी झाली? बरोबर? simple.
त्याचसाठीच, जर आपण आपला ग्रंथराज बघितला तर लक्षात येईल, की तो परमेश्वर निर्गुण-निराकार, दत्तगुरु ज्याला आपण म्हणतो, संबोधलं जातं, तो जेव्हा निर्गुण-निराकार स्वरुपामध्ये होता तेव्हाच त्याच्यामध्ये कोण होती? अदिति होती. बरोबर? जेव्हा त्याच्यामध्ये प्रथम स्पंद निर्माण झाला, तेव्हा कोण कार्यरत झाली होती? गायत्री. बरोबर? गायत्री म्हणजे काय? तर परमेश्वराची मी परमेश्वर आहे, ही जाणीव. विसरले, ग्रंथ वाचला आणि बंद केला, बरोबर? त्या परमेश्वराची मी परमेश्वर आहे, ही जाणीव म्हणजेच ही जगदंबा. बरोबर? ही परांबा. ही ब्रह्मत्रिपुरसुंदरी. बरोबर? ही जाणीव, म्हणजे परमेश्वराची स्वतः मी परमेश्वर आहे, ही जाणीव म्हणजेच ही आदिमाता. बरोबर?
ह्या आदिमातेने आपण बघितलं काय? सगळी सृष्टी निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा, तीन पुत्र उत्पन्न केले. बरोबर, पटतंय? प्रणव प्रगटला, त्याबरोबर हे तिघे प्रगटले. दत्तात्रेय, किरातरुद्र, आणि परमात्मा. बरोबर? मग ह्या परमात्म्याची तीन रूपं प्रगटली. नंतर मग त्यातून शिवात्मे वगैरे वगैरे आपण वाचलेलं आहे. हे सगळं आहे, पण माणसाला कधी पसरली त्याची जाणीव? तर पहिल्यांदा लक्षात घ्यायची ही गोष्ट, की जाणीव ही जी माणसाची गोष्ट आहे, ही जाणीवच सर्व पातळ्यांवर काम करत असते. आपण ज्याला जाणीव म्हणतो, जेव्हा मी म्हणतो, की मी परीक्षेला जाण्यासाठी १० वाजता येणार आहे. ह्याचा अर्थ मला जाणीव आहे, की ११ वाजता पोहोचायचं आहे, तर मला १० वाजता निघायला पाहिजे. मध्ये जायला पाऊण तास लागतो, १५ मिनिटे लवकर पोहोचलं पाहिजे, ही पण मला काय आहे, जाणीव आहे. पटतं? आपल्याला भूक लागते म्हणजे काय होते? भूकेची जाणीव झाली. बरोबर? एखादा मनुष्य बेशुद्ध आहे, त्याने दोन दिवस काही खाल्लेलं नाही, त्याचं पोट रिकामच आहे, त्याच्या पण रक्तामधली शुगर कमी झालेली असणारच आहे. पण त्याला काय आहे? त्याला जाणीव नाही आहे. म्हणजे प्रत्येक कार्य घडतं, ते कशामुळे घडतं? तर जाणीवेमुळे घडतं. अजाणतेपणाने कुठलंही definite कृत्य घडू शकत नाही.
अजाणतेपणाने काय घडतं? accidents. अपघात. जाणीव नसेल तर काय घडतं, अपघात घडतात. बरोबर? तुम्ही चाललात रस्त्याने, तुम्हाला जाणीव नाही, खालून साप चालला आहे, कोणी सापाच्या डोक्यावर पाय दिला, तर काय होईल? चावणार आहे साप, बरोबर की नाही? हा काय आहे अपघात आहे. तुम्हाला जाणीव नसल्यामुळे झालेला अपघात आहे. बरोबर? म्हणजे जाणीव ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥