शंख हे त्रिविक्रमाचे प्रमुख चिन्ह आहे (Conch is the main symbol of Trivikram) - Aniruddha Bapu
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘शंख हे जातवेदाचे (त्रिविक्रमाचे) प्रमुख चिह्न आहे' याबाबत सांगितले. जातवेदाचे शंख हे प्रमुख चिन्ह आहे. त्रिविक्रम हा हरिहर असल्यामुळे हा शंख फुकल्यावर डमरूचा आवाज उत्पन्न होतो. म्हणजेच विकास करणार्या शंखामधून आवाज लयाचा (डमरूचा) येतो म्हणजेच हा शंख १०० टक्के यशाची खात्री देतो. त्रिविक्रमाच्या आणि त्याच्या मातेच्या म्हणजेच आदिमातेच्या श्रद्धावानाला १०० टक्के यश मिळणारच आहे, पण त्यासाठी तो त्रिविक्रम सर्वकाही जाणतोच हे समझून त्याच्याशी बोलायचे, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥