अफवांचे भोई
हरि ॐ आज श्री.वैभवसिंह कुलकर्णीने पोस्ट केलेली नोट बघितली. ही नोट म्हणजे शब्दश: माझे मनोगत आहे.
--------------------------------------------------------------------
अफवांचे भोई
हरी ओम .. सोशिअल मीडियावर सध्या एका मेसेजची खूप देवाण घेवाण केली जात आहे. परदेशातील श्रद्धावानांसोबत समीरदादांनी केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मधले हे मुद्दे आहेत असा दावा ह्या मेसेज मध्ये केलेला आहे. हे मेसेजेस वाचल्यावर पहिला विचार माझ्या डोक्यात आला की समीरदादांना जेंव्हा एखादा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवायचा असतो तो ऑफिशिअल मार्गानी आपल्या पर्यंत पोहोचतो मग आपण सगळे जण ऑफिशिअली हा मेसेज समीरदादांकडून आलेला नसताना का फॉरवर्ड करत सुटलो आहोत?
आता मुद्दा समीरदादांच्या परदेशातील श्रद्धावानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा. समीरदादा अनेक श्रद्धावानांसोबत इन्फॉर्मली बोलत असतात. इन्फॉर्मल बोलण्याची पद्धत हि वेगळीच असते आणि समीरदादांचं असं एखाद इन्फॉर्मल बोलणं ऑफिशिअल मेसेज असल्या सारखं फॉरवर्ड करणं आणि तेही त्यांची कुठलीही अनुमती न घेता, मला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यांनी कुणी हे केलंय हा केवळ संधीचा घेतलेला गैरफायदा आहे. आणि त्यांना आपल्या कर्तव्याची काडीचीही जाणीव नाही असं माझं स्पष्ट मत आहे. समीरदादांनी साधलेला संवाद हा त्या त्या ग्रुप साठी असतो हे ध्यानात घ्यायला हवं. आणि असे प्रकार जर घडत राहिले तर त्याचा परिणाम असा होईल की समीरदादा असं इन्फॉर्मली बोलणंच बंद करतील.
असे अनऑफिशिअल मेसेजेस जेंव्हा फॉरवर्ड होतात तेंव्हा त्याचे अर्थाचे अनर्थ होऊ शकतात. आताचं उदाहरण बघा ना, अनेक ग्रुप्सवर आलेल्या त्याच मेसेज मध्ये नवनवीन गोष्टी कुणीतरी ऍड करत गेलेलं दिसतंय. ह्याचाच अर्थ कुणीतरी अनवधानानं किंवा हेतुपुरस्सर माहिती स्वतःच्या मनाने टाकत गेलंय.
आता कुणाला वाटेल की त्यात काय इतकं! आम्ही काळजीपोटी मेसेज फॉरवर्ड केले पण अनऑफिशिअल मेसेज फॉरवर्ड करण्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात हे समजून घेणे गरजेचे आहे आणि त्याचे परिणाम हे काही आपल्याला सहन करावे लागणार नाहीत पण मग कुणाला भोगावे लागतील हे तुम्हीच समजून जा. गेली अनेक वर्ष मीडियात असल्याने असल्या बिनबुडाच्या मेसेजेसचा परिणाम किती भयंकर होऊ शकतो ते मी पाहिलं आहे आणि म्हणून केवळ सावध करण्यासाठी हा पत्र प्रपंच. सध्या जगभरातली स्थिती पाहता आपण सगळ्यांनीच सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.
आपल्याला जे जे कळवायचं आहे ते समीर दादा ऑफिशिअली कळवतीलच पण कुठलाही अनऑफिशिअल मेसेज ह्या पुढे फॉरवर्ड करत बसणं कटाक्षाने टाळायला हवं. अनर्थ ओढावणाऱ्या अफवांचा मी तरी भोई होऊ नये इतकी काळजी तरी आता आपण प्रत्येक जण घेऊयात. हरि ओम, श्रीराम अंबज्ञ . वैभवसिंह कुलकर्णी. 3-5-2020
II हरि ॐ II श्रीराम II अंबज्ञ II II नाथसंविध् II