बापूंची (अनिरुद्धसिंह) तपश्चर्या ( Bapu's Aniruddhasinh's penance )
गुरुपौर्णिमेच्या आधिच्या गुरुवारी बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्या सर्व श्रध्दावान मित्रांना उद्देशून सांगितलं की त्यांच्या तपश्चर्येचा दुसरा खंड म्हणजेच ’उपासना खंड’ आषाढी एकादशी पासून सुरु होईल आणि तो ’उपासना खंड’ चालू झालाही. हा दुसरा खंड येत्या दसर्याला संपन्न होणार आहे.
बापूंच्या (अनिरुद्धसिंह) सर्व श्रध्दावान मित्रांना बापूंच्या (अनिरुद्धसिंह) स्वतिक्षेम तपश्चर्येची कल्पना आहेच. मागच्या घटस्थापनेपासून बापूंची (अनिरुद्धसिंह) स्वतिक्षेम तपश्चर्या चालू झाली व रामनवमीला संपन्न झाली. ह्या तपश्चर्येची फलश्रुती म्हणजे सर्वांग ब्रम्हास्त्र आणि सर्वांग करुणाश्रय ह्या दोन गोष्टी प्राप्त करून घेणे.
ही बापूंची (अनिरुद्धसिंह) तपश्चर्या मोठ्याआईच्या कृपेच्या परिणाम स्वरुप सर्वसंपन्न झाली व त्यायोगे आपल्या सर्वानांच रामनवमीच्या आधल्या रात्री श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम्मध्ये मोठ्याआईचे अस्तित्व तीच्या उमटलेल्या चरणांना बघून अनुभवता आले.