अनिरुद्ध चलिसा पठण
सद्गुरू नामसंकिर्तनाचे आणि सांघिक पठणाचे महत्त्व आपणा सर्व श्रध्दावानांना माहीतच आहे. अनिरुध्द चलिसा पठण केल्याने सद्गुरूंवरील विश्वास दृढ होण्यास आपल्याला मदत होते हा श्रध्दवानांचा विश्वास आहे. म्हणून आपल्या संस्थेतर्फे गेल्या ३ वर्षांपासून श्रीहरिगुरुग्राम यथे ‘अनिरुद्ध चलिसा पठण’ आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हे पठण शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर २०१५ रोजी आयोजित केले असून ते सकाळी ९:०० ते रात्रौ ९:०० पर्यंत चालू राहील. या पठणादरम्यान सद्गुरूंची ‘पदचिन्ह’ दर्शनासाठी श्रीहरिगुरूग्राम येथे ठेवण्यात येतात. त्या पदचिन्हांवर प्रत्येक श्रद्धावानाला बेल व तुळस अर्पण करता येईल.
ज्या श्रद्धावानांना ‘जपक’ म्हणून संपूर्ण दिवस अनिरुद्ध चलिसाचे पठण करण्याची इच्छा आहे, त्यांनी श्री. प्रभाकरसिंह शेट्टी (+919820998544, [email protected]) व श्री. शेषगिरीसिंह शेट्टी (+919820090397, [email protected]) यांच्याशी संपर्क साधावा.
मला खात्री आहे जास्तीत जास्त श्रद्धावानमित्र अनिरुद्ध चलिसा पठणात सहभागी होतील.
॥ हरी ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥