श्री अनिरुद्धगुरुक्षेत्रम्मध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) केले "१२ श्री बाणलिंगांचे" आणि "३ शाळीग्रामांचे" पूजन ( Aniruddha Bapu performed Pujan on 12 Banlinga and 3 Shaligram at Shree Aniruddha Gurukshetram)
"१२ श्री बाणलिंगांचे" आणि "३ शाळीग्रामांचे" पूजन
(Aniruddha Bapu performed Pujan on 12 Banlinga and 3 Shaligram at Shree Aniruddha Gurukshetram)
शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१२ रोजी रात्रौ ८.४५ मिनिटांनी बापूंचे (अनिरुद्धसिंह) श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे आगमन झाले. त्यांनी येताना स्वतः बरोबर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधित्व करणारी, स्फटिकाची १२ श्रीबाणलिंगे आणली व ती त्यांनी एका ताम्हणात ठेवली. त्यानंतर ते ताम्हण धर्मासनावर ठेवले. ह्या बारा श्रीबाणलिंगापैकी एका बाणलिंगाचा आकार मोठा व रंग वेगळा असून, जशी खूण श्रीमहादुर्गेश्वराच्या ठिकाणी आहे, तशीच खूण ह्या श्रीबाणलिंगाला आहे.
श्रीमहादुर्गेश्वराच्या ठिकाणी असलेली खूण श्रीबाणलिंगावर दाखविताना (अनिरुद्धसिंह) |
धर्मासनावरील या ताह्मणाच्या बाजूला एका दुसर्या ताम्हणात, श्रीजगन्नाथ उत्सवाच्या वेळी (२००२-२००३) पूजन केल्या गेलेल्या १०८ शाळीग्रामांपैकी ३ शाळीग्राम बापूंनी पूजनासाठी ठेवले. हे १०८ शाळीग्राम, श्रीजगन्नाथ उत्सवानंतर श्रीगोविद्यापीठम् येथे ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हे शाळीग्राम श्री अनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे आणण्यात आले आणि त्यांचे नित्य-पूजन तुळशीपत्र अर्पण करून केले जाते.
श्रीबाणलिंग |
श्रीजगन्नाथ उत्सवातील शाळीग्राम |
बापूंनी (अनिरुद्धसिंह) ह्या शाळीग्रामांवर तुळशीपत्रे अर्पण केली व १२ श्रीबाणलिंगांवर बिल्वपत्रे अर्पण करून त्यांचे पूजन केले. पूजन झाल्यावर तेथे उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान बापूभक्तांबरोबर बापूंनी (अनिरुद्धसिंह) श्रीमहादुर्गेश्वराचा 'ॐ नमो भगवते श्रीमहादुर्गेश्वराय नमः ll" हा जप केला.