आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो (The third eye of Aadimata makes your life auspicious)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०९ जानेवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो’ याबाबत सांगितले.
Fear of injury, आयुष्य आमचं सगळं या एका fear मध्ये बंदिस्त होऊन पडतं. पटतंय? या fear मधून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या आईने एक अल्गोरिदम दिलेला आहे, अतिशय सुंदर. आपण जो मंत्र म्हणतो या स्वस्तिक्षेम संवादम् मध्ये, त्याच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो -
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्यै त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
त्र्यंबके गौरी म्हणजे जिला ३ डोळे आहेत अशी गौरी. तिसरा डोळा (तृतीय नेत्र) तिचा कुठे आहे? मधोमध उभा डोळा आहे तिचा असा. आलं लक्षामध्ये? हा जो तृतीय नेत्र आहे म्हणजे आपण जिथे स्वस्तिक काढतो बरोबर? तर तिसरा डोळा जो आहे, तो कशासाठी आहे? तर इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ह्या श्लोकामध्ये तो अल्गोरिदम दिलेला आहे, शिवे सर्वार्थसाधिके। सर्व पुरुषार्थ साधून देणारी म्हणजे सर्व प्रकारच्या श्रमांना, श्रमांसाठी तुम्हाला श्रमशक्ति देणारी आहे. तुम्हाला स्किल देणारी आहे, कौशल्य देणारी आहे, तुम्हाला potency देणारी आहे, कार्यक्षमता देणारी आहे, तुम्हाला activeness देणारी आहे आणि कशी तर त्र्यंबके गौरी, त्र्यंबका.
तिचा तृतीय नेत्र जो आहे, तो सदैव. तुम्ही जे बघत असा कि बघू नका, हा तृतीय नेत्र जो आहे, हा कसा आहे, तो सगळ्यांचा बॅलेन्स राखतो. म्हणजेच काय? जिकडे बॅलेन्स बिघडू शकतो, तिथे बॅलेन्स परत, जो बॅलेन्स देणारा, तो बॅलेन्स पूर्ववत करण्याचं काम कोण करतो? हा आदिमातेचा तृतीय नेत्र. आणि म्हणून मनुष्याला ती सर्व पुरुषार्थ साधिके. सर्वार्थ साधिके. तुम्हाला जे जे चांगलं करायचय ते करतांना तुम्हाला जे काही लागू शकतं, म्हणजे बॅलेन्स ढळू शकतो, तुम्ही injured होऊ शकता, त्यामधून तुम्हाला वाचवणं आणि injury झालीच, तर भरुन टाकणं ती injury, हे काम कोण करतं? हा आदिमातेचा तृतीय नेत्र. आलं लक्षामध्ये? हा आईचा तृतीय नेत्र जो आहे, तो बेसिकली काय करणार आहे? कि तुमच्यासाठी तुम्हाला लागू नये, ह्यासाठी तो सदैव दक्ष असतो, आणि तरी लागलच तर जखमा भरण्यासाठी तो दक्ष असतो.
त्याच्याकडे बघा किंवा बघू नका. सर्वमंगलमांगल्ये। मंगलांचेही मंगल करणारी अशी जी आहे आणि कसं सर्व, सर्वत्र, म्हणजे एका जीवनात मंगल करेल, दुसर्या जीवनात अमंगल करेल असं नाही आहे. `सर्वमंगलमांगल्ये, शिवे सर्वार्थसाधिके॥'
आदिमातेचा तृतीय नेत्र जीवन मंगलमय करतो, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥