आचमन (Aachaman) - Aniruddha Bapu Pitruvachanam
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ' आचमन म्हणजे त्रिविक्रमाचं स्मरण आणि सन्मान आहे ' याबाबत सांगितले.
तुम्ही एक प्रयोग सगळ्यांनी करुन बघा. व्यवस्थित शास्त्रशुद्धपणे पंचधातूच्या एका तांब्याच्या पळीतून तुम्ही तेवढच पाणी घ्यायचं, हातावर नीट घ्यायचं आणि प्यायचं. तुम्हाला जाणवेल ते पाणी पिण्याची क्रिया अशी घडते, आपल्या मसल्सच्या, ह्या pharyngeal musclesच्या contraction reactions मुळे संपूर्ण घसा आणि तोंड व्यवस्थित ओलं होतं.
जे काम एक ग्लास पाण्याने होणार नाही, ते काम ह्या एका आचमनाने होतं. आचमनं आम्ही किती घेतो नेहमी? तीन घेतो. ते तीन आचमन म्हणजे काय? तीन आचमनं मिळून एक आचमन होतं, तीन वेळा पाणी पिणं म्हणजे ह्या त्रिविक्रमाचं सन्मान आहे, त्याचं स्मरण आहे. म्हणून प्रत्येक धर्मकार्यामध्ये आचमन घ्यावंच लागतं. धर्मकार्यामध्ये, मग ते शुभ असो कि आपण ज्याला म्हणतो, दुःखाचं आहे, तिकडेसुद्धा आचमन घ्यावंच लागतं, पद्धत तीच आहे, नावं पण तीच आहेत. किती पटलं? कुठल्याही देवाचं पूजन असो, आचमनाची नावं तीच आहेत. पण आम्ही कधी करुन बघितलं आहे का? आम्ही आपलं पाणी पितो, पितो कसबसं हात इथे पुसायचा घाईत.
नाही, आचमन ही आपल्या हिंदू संस्कृती मधली, वैदिक संस्कृतीमधली, ह्या भारतीय संस्कृतीमधली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पाणी पितांना आचमनासारखंच प्यावं. काहीतरी वेडेपणा करू नका, एक ग्लास घेतला आहे, आणि चमच्या चमच्याने पिता आहात. असं करायचं नाही. हळूहळू प्यायचं. मागे सांगितलेलं आठवतं ना की प्यावं कसं पाणी की जेवतोय असं. आणि जेवावं कसं? पाणी प्यायल्यासारखं. म्हणजे काय तर जेवतांना एवढं चावून चावून खावं की तो तोंडात घातलेला पदार्थ पाण्यासारखा सहजतेने गिळता आला पाहिजे, तर पाणी कसं गिळावं? एक एक घास. ह्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि ह्या पाण्यामध्ये ह्या त्रिविक्रमाची स्पंदनं असतात.
त्रिविक्रमाची स्पंदनं तुम्ही पिण्याच्या प्रत्येक पाण्यामध्ये असतातच लक्षात ठेवा की पाणी जे आम्ही पितो, त्या पाण्यामधलं आचमन हे जर आम्ही दररोज, म्हणजे पाणी पिण्याची क्रिया जर आम्ही त्या पद्धतीने केली, तर आमच्या शरिरामध्ये कोणाची vibrations खेळणार आहेत? त्रिविक्रमाच्या ह्या अल्गोरिदमची. आणि ह्यामुळे खरोखरच कमालीचे फरक पडतात लक्षात ठेवा, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥