’A2’ गाईचे दूध

हरि ॐ

श्रद्धावानांच्या सोयीसाठी काही दिवसांपासून आपण ’शताक्षी वटी’ उपलब्ध करून दिली आहे. सद्य परिस्थितीत व धकाधकीच्या जीवनात ’शताक्षी प्रसादम्‌’ घरी करणे प्रत्येकाला शक्य होत नव्हते, हे लक्षात घेऊन ’शताक्षी वटी’ ची सोय करण्यात आली.

त्याचप्रमाणे भारतीय वंशाच्या गाईच्या दुधाचा फायदा (’A2’ प्रकारचे दूध) श्रद्धावानांना मिळावा या कारणास्तव छोट्या प्रमाणात मुंबईतील श्रद्धावानांना प्रायोगीक तत्वावर हे दूध उपलब्ध करून देण्यात आले; व त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला; व या दूधाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. हे लक्षात घेऊन ’शताक्षी वटी’ ज्या आस्थापनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली त्याच आस्थापनाच्या म्हणजेच "अ‍ॅफ्रा" च्या ("Aphra") माध्यमातून हे दूध सध्या मुंबई व पुणे भागात मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

तसेच A2 दूधापासून तयार झालेले तूप व श्रीखंड श्रद्धावानांना आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हिंदी