वयानुसार अनुभवातही वाढ होत असते (With age comes experience) - Aniruddha Bapu
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वयानुसार अनुभवातही वाढ होत असते’बाबत सांगितले.
आम्ही अनेकांची पंचाहत्तरी करतांना बघतो ना, ते थरथरत असतात हार घालून घेताना. लोकांची रांग लागते पंचाहत्तरीसाठी हार घाला, हार घाला. त्याला माहित असतं, कधी मी आडवा झोपलेला असेल आणि हेच लोकं हार घालत असतील. येस, ही भीती त्याच्या मनात असते. किती जणांच्या मनात असते? ९९% लोकांच्या मनात असते. आणि ते काय समजतात? आता बेरीज नाही. आता वजाबाकी, आता भागाकार.
नाही, अजूनही गणित गुणाकाराचंच आहे. कारण? कारण जेव्हा तो जन्माला आला तेव्हा तो १ च होता. आणि जेवढा अनुभव वाढला, तो ११ झाला, अनुभव वाढल्यावर तो १११ झाला. म्हणजे आज आपण जर बघितलं कि १० वर्ष, २० वर्ष, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९०, तर त्या वर्षी तुमच्या अनुभवांची संख्या किती वाढली आहे म्हणजे तुमच्या जवळ कितीही कमी वेळ असला, तरी त्या प्रमाणात तुमची quality सुधारलेली आहे. तुमची अनुभवसृष्टी समृद्ध झालेली आहे. त्यामुळे तुमचे कमी तास तुम्हाला भिववता कामा नयेत. ज्या अचूक विचारात येण्यासाठी, तरूण वयामध्ये तुम्हाला १३ वर्षे लागली असतील, ती वयाच्या सत्तरीच्या पुढे may be तेरा तासच होईल. का? कारण एवढा जगाचा अनुभव घेतलेले तुम्ही आहात. त्या अनुभवांचा गुणाकार आहे, लक्षात ठेवा.
पण आता मी ७८ वर्षाचा झालो आहे, आता मी काय करु? २-४ वर्ष जेमतेम उरली आहेत की नाही उरली आहेत, म्हणून भिऊन माणसाने जाता कामा नये. का? अरे, तो एवढ्या वर्षांचा अनुभव आहे ना. एवढ्या दिवसांचा, एवढ्या तासांचा, एवढ्या मिनिटांचा अनुभव असलेले तुम्ही आहात आणि त्याने तुम्ही गुणले जाणार आहात.
म्हणजे १०व्या वर्षी तुमच्या जीवनातला गुणाकार हा आहे, तर ९०व्या वर्षी तुमच्या जीवनातील गुणाकार हा आहे. लक्षात ठेवा. हे हा त्रिविक्रमाचा नियम आहे. हा एकांक अल्गोरिदम आहे, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥