Website Launch WW3

Hari Om,

The past 3-4 years have seen conflicts developing worldwide and worsening by the day, rather by the hour. Nations across the globe have more or less been polarized and now in the year 2018, ongoing conflict has come to be an everyday affair in several parts of the world and that indeed is the reality.

Horrific human brutality stomps wild and defiant on the lands of Syria, Libya, Yemen, Iraq, Afghanistan, Israel-Palestine, Somalia, Sudan, Nigeria, Venezuela, etc.; in fact in more than 60 countries. Moreover tensions are extremely high in Europe-Ukraine-Russia, South China Sea, India-Pakistan, Saudi-Iran, etc. and are poised at such junctions that they may catapult into a full-scale conflict to be a part of the Third World War.

Inspite of this, the common man is largely unaware about the gravity and the effects of situation. Taking this into consideration, we are launching a website www.worldwarthird.com.

This site will be publishing news with a very specific and exclusive focus on the ‘Third World War’ that are being published in the Dainik Pratyaksha under the guidance of Dr. Aniruddha D. Joshi since 6th March 2018. These news highlight various facts and effects related to the adversity and also give us the perspective of war, past and future.

Moreover, the website will be a ‘gateway’ to open discussions across social media platforms such as Twitter, Facebook, Instagram, Google Plus, Pinterest, etc. We welcome viewers to share their thoughts, opinions, analysis and other happenings with respect to the World War, which beyond doubt will be the most brutal of all.

Through this website you can participate by expressing your views, opinions and information on the subject ‘Third World War’ and on the effects of the war, past and future at :-

 1. Twitter - https://twitter.com/ww3info
 2. Watch videos - https://twitter.com/ww3videos
 3. See photos on Instagram - https://www.instagram.com/thirdworldwar_news/ and
 4. Pinterest - https://in.pinterest.com/thirdworldwar_news/
 5. Facebook - https://www.facebook.com/Third-World-War-382492202159270/
 6. Google Plus – https://plus.google.com/106534928845401500853

हरि ॐ,

गेल्या ३-४ वर्षापासून जागतिक पटलावरती कमालीच्या घडामोडी घडत आहेत. आधी दिवसागणिक बदलणारी परिस्थिती जागतिक कलहामुळे आता तासागणिक बदलू लागली आहे. जगभरातील अनेक राष्ट्रांचे कमीअधिक प्रमाणात ध्रुवीकरण झालेले आहे, आणि आता २०१८ मध्ये जगातील अनेक भागांमध्ये सुरू असणारे तंटे दैनंदिन संघर्षाचे रूप घेत आहेत आणि हेच वास्तव आहे. भयानक मानवी क्रौर्याचे पाशवी व निर्दयी तांडव सिरीया, लिबिया, येमेन, इराक, अफगाणिस्तान, इस्त्राईल-पॅलेस्टाईन, सोमालिया, सुदान, नायजेरिया, व्हेनेझुएला इ. जवळपास ६० राष्ट्रांमध्ये सुरू आहे. शिवाय यूरोप-युक्रेन-रशिया, साउथ चायना सी, भारत-पाकिस्तान, सौदी-इराण इ. प्रांतातील तणाव इतका शिगेला पोहोचला आहे की कुठल्याही क्षणी भीषण व व्यापक तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडु शकतो. इतके असूनसुद्धा सामान्य मानव ह्या वास्तवाशी, दाहकतेशी व परिणामांशी बराचसा अनभिज्ञ आहे.

या सगळ्याचा विचार करता डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले बापू यांच्या मार्गदर्शनाखाली ’दैनिक प्रत्यक्ष’ दिनांक ६ मार्च २०१८ पासून तिसर्‍या महायुद्धाच्या संबंधीत विशेष बातम्या प्रकाशित करीत आहे. त्याच अनुषंगाने आपण एक वेबसाईटही लॉन्च करत आहोत. वेबसाईटची URL खालील प्रमाणे आहे.

Website URL - http://www.worldwarthird.com/

ही वेबसाईट फक्त तिसर्‍या महायुद्धाच्या संबंधीत विशेष बातम्या, लेख व युद्धांचे परिणाम व भीषणता आणि त्यामुळे पुढे वाढून ठेवलेला भविष्यकाळ या सर्वांचे दाहक स्वरूप आपल्यासमोर उलगडत नेईल. शिवाय ही वेबसाईट म्हणजे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, पिंटरेस्ट इत्यादी विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचे प्रवेशद्वार खुले करुन देईल, जिथे तुम्ही ह्यासंबधी विषयांवर आपले विचार व मत मांडु शकता आणि माहिती घेऊ / देऊ शकता. तिसर्‍या महायुद्धाच्या संबंधीत वाचकांच्या विश्लेषणांचेदेखील आम्ही स्वागत करू.

या वेबसाईटद्‍वारे तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत तुम्ही तुमचे विचार, मतं व माहिती खालील ठिकाणी मांडू शकता.

 1. ट्विटर वर - https://twitter.com/ww3info
 2. ट्विटरवरील तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत व्हिडीओज्‌वर - https://twitter.com/ww3videos
 3. इन्स्टाग्राम (https://www.instagram.com/thirdworldwar_news/)
 4. पिंटरेस्ट (https://in.pinterest.com/thirdworldwar_news/) वरील तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत फोटोंवर
 5. फेसबुकवरील (https://www.facebook.com/Third-World-War-382492202159270/)
 6. गुगल प्लस (https://plus.google.com/106534928845401500853) तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत पोस्टवर
तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत बातम्या व प्रतिक्रिया वाचक http://newscast-pratyaksha.com/ या वेबसाईटवर पाहू शकतात.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥