वयानुसार अनुभवातही वाढ होत असते - भाग २ (With age comes experience - Part 2) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्गुरू श्री सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात 'जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची क्षमता वाढतच जाते' याबाबत सांगितले.

‘आमचं वय वाढलं की आमचा गुणाकार बंद होतो ५० नंतर’, हा विचार सोडून द्या. आमचा गुणाकार अधिक समृद्ध होतो. तरुण वयामध्ये पण जेवढा गुणाकार आमच्याकडे नव्हता, तेवढा गुणाकार त्रिविक्रमाने आमच्या वयस्कर वयानुसार, वाढत्या वयानुसार आम्हाला दिलेला आहे. 

किती पटलं बाळांनो? अरे काय? हो की नाही? सगळे काय १४ वर्षाचे बसले आहेत की काय? नाही ना? म्हणजे सगळे Teenagers एकदम. ओके काय? अरे समजलं की नाही बाळांनो? नक्की? जोरात म्हणा. हे समजणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मग वाढत्या वयाची भीती वाटत नाही आणि ही केवळ मनाची कल्पना नाही, ही सत्य गोष्ट आहे, कारण हा त्रिविक्रमाचा नियम आहे. हा त्रिविक्रमाचा अल्गोरिदम आहे. एकांक

मनुष्य प्रत्येक एक मिनिट सेकंदाने mature होतो. प्रत्येक एक मिनिटाने अधिक mature होतो. प्रत्येक एक वर्षाने ३६० पट mature होतो. लक्षात आलं? म्हणजेच जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची capacity वाढतच चालल्यामुळे तो कुठल्याही वयामध्ये असो, त्याच्याकडे वेळेची कमतरता असू शकत नाही की आता एकच वर्ष उरलं. नाही. आलं लक्षामध्ये? ही महत्वाची गोष्ट आपण ह्या अल्गोरिदम मधून समजून घेतली पाहिजे. आणि ही त्रिविक्रमाची गुणाकार पद्धती. आलं लक्षामध्ये? माणसाचं वय गुणिले माणसाचा अनुभव. ह्याने त्याची खरी capacity ठरते, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता. 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle