What happens when we start loving God?

In his discourse dated 4th June 2003, Sadguru Shree Aniruddha Bapu discusses why and how one should study God. As he explains this, Bapu mentions a principle that Rishi Shaunak has referred to as 'Pramana Siddhanta' (प्रमाण सिद्धांत). According to this principle, a person automatically studies whatever they love wholeheartedly.

Here, Sadguru Aniruddha says that to solve important questions in life, one should study the Parameshwar according to this principle. To do so, we need to be able to love God abundantly. It is because of this study that one begins to understand Parmeshwar and His love more and more, leading to the creation of a beautiful cycle.

That is why Sadguru Bapu explains how while reading God's book, listening to his story and doing his Naamasmaran, one can comprehend it better.


सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू, ४ जून २००३ च्या आपल्या प्रवचनात, 'भगवंताचा अभ्यास का व कसा करावा' ह्याबाबत सांगत आहेत. हे स्पष्ट करताना, ते एका सिद्धांताबाबत सांगतात, ज्याचा उल्लेख शौनक ऋषींनी 'प्रमाण सिद्धांत' असा केला आहे. ह्या सिद्धांतानुसार, ज्या गोष्टीवर आपण मनापासून प्रेम  करतो, त्या गोष्टीचा आपण आपोआप अभ्यास करतोच.

बापू इथे म्हणतात कि ह्या सिद्धांतानुसार, आयुष्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी मला त्या परमेश्वराचा अभ्यास केला पाहिजे व त्यासाठी त्याच्यावर खूप प्रेमही केले पाहिजे. ह्याच अभ्यासामुळे मला, परमेश्वर व त्याचे प्रेम अधिकाधिक कळत जाते व ते एका सुंदर चक्राच्या निर्मितीला कारणीभूत ठरते.

म्हणूनच, परमेश्वरावरील ग्रंथ वाचताना, त्याची कथा ऐकताना व त्याचे नामस्मरण करताना आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे कसे समजू शकेल, हे बापू आपल्याला त्यांच्या ह्या पितृवचनातून समजावून सांगत आहेत.