श्रीगणेशाला ‘वरदमूर्ती’ म्हणून का संबोधले जाते? – सद्गुरु अनिरुद्ध बापू
"लम्बोदरायैकदन्ताय ॥ विघ्ननाशिने शिवसुताय । श्रीवरदमूर्तये नमो नमः|" या 'श्री गणपति अथर्वशीर्ष' स्तोत्रामधील पदामध्ये, आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्री गणेशास 'श्रीवरदमूर्ती' म्हणून संबोधिले जाते. परंतु ह्या गणेशासच 'श्रीवरदमूर्तये' ही पदवी लावलेली वारंवार का आढळते?
मानव त्याच्याकडेच असणाऱ्या आहार, विहार, आचार आणि विचार ह्या चार गोष्टींचा वापर कशा प्रकारे करत असतो? मानवाला कुठल्याही अमंगल नसणाऱ्या कार्याच्या आधी श्रीगणेशाची उपसना का करावी लागते?
मूलाधार चक्रावर मनुष्याची कुठली कार्ये अवलंबून असतात? बर्याचदा कर्मस्वातंत्र्य सुव्यवस्थितपणे न वापरल्याने सामान्य मनुष्याची ताकद कमी पडत असते.
विघ्ननाशक श्रीगणपती हे मूलाधारचक्राचे स्वामी आहेत. ते त्यांच्या सहचारिणी, 'रिद्धी' आणि 'सिद्धी' यांच्या सहाय्याने प्रत्येक कार्यात आपल्याला सहाय्यभूत कसे ठरतात? तसेच प्रत्येक कार्यापूर्वी गणेशाला आळविणे, त्याची प्रार्थना करणे व त्याची आठवण ठेवणे आवश्यक का ठरते? मुख्य म्हणजे हाच श्रीगणेश खऱ्या अर्थाने ‘वरदमूर्ती’ कधी व कसा ठरतो — हे सर्व, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू दि. १६-८-२००७ रोजीच्या प्रवचनात आपल्याला सरळ व सोप्या भाषेत समजावून सांगतात.
"Lambodarāya Ekadantāya, Vighnanāśine Shivasutāya, Shrīvaradamūrtaye Namo Namah" —
In this verse from the 'Shree Ganapati Atharvashirsha' stotra, our beloved deity Shree Ganesha is addressed as "Shrīvaradamūrti" (the divine form who grants boons). But why is this very Ganesha so frequently referred to with the title "Shrīvaradamūrtaye"?
How does a human utilise the four aspects that are solely in his control — āhār (intake), vihār (wandering of body and mind), āchār (conduct), and vichār (thoughts)?
And why is it necessary for a person to worship Shree Ganesha before beginning any task that is not inauspicious?
What human actions are governed by the Mūlādhāra Chakra?
Often, when the power of Free Will (Karma-Swaatantrya) is not exercised properly, an average person begins to feel a lack of strength or capability.
Shree Ganapati, the remover of obstacles, is the ruler of the Mūlādhāra Chakra. With the aid of his consorts — Riddhi and Siddhi — how does he support us in every endeavor?
Moreover, why is it important to invoke, pray to, and remember Ganesha before undertaking any action?
Most importantly — when and how does this very Shree Ganesha truly become the "Varadamūrti", the divine bestower of blessings?
All of this was explained in a simple and clear manner by Sadguru Shree Aniruddha Bapu during his discourse on August 16, 2007.