त्रिविक्रमाचा गुणाकार अल्गोरिदम (The Multiplication Algorithm of Trivikram) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमाच्या गुणाकार अल्गोरिदम’बाबत सांगितले.

त्रिविक्रमाचा गुणाकार अल्गोरिदम (The Multiplication Algorithm of Trivikram)
त्रिविक्रमाचा गुणाकार अल्गोरिदम (The Multiplication Algorithm of Trivikram)

 

आपल्याला ज्या व्यक्तिचा राग येतो, त्याच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी add नाही होत, त्या रागाला multiply करत जातात. दुप्पट राग. आज सकाळी एक होता, आता दोन आहे राग, संध्याकाळी चार होतो, चारचा आठ होतो, राग multiply होतो, द्वेष पण multiplyच होतो आणि कमी होताना मात्र भागला जात नाही, काय होतं, वजाबाकी केली जाते. सावधपणा म्हणतो आपण त्याला.

अरे काही झालं असेल, चूक झाली असेल, भांडण झालं असेल, पण विसरायला काय हरकत आहे! विसरायची capacity आपल्यामध्ये, ती नसते. आम्ही देवाला लवकर विसरतो, पण माणसाने केलेल्या चुका मात्र आपण कधीच विसरत नाही. त्या आठवतातच. कुठलीही व्यक्ति भेटल्यानंतर तिने चांगलं काय केलं हे आठवायच्या ऐवजी, त्या व्यक्तिने वाईट काय केलंय, हे पहिल्यांदा आठवतं. पटतंय?

हा त्याचा मार्ग नाही, हे लक्षात आम्हाला कळलं पाहिजे कि त्रिविक्रमाचा मार्ग मात्र हा नाही आहे. तो जेव्हा तुम्हाला बघतो, तेव्हा तुम्ही काय चुका केल्या आहेत, त्याची बेरीज घेऊन बसत नाही. तो गुणाकार करत जातो. ही सृष्टी त्याने उत्पन्न केली आहे, तीसुद्धा गुणाकारातूनच केली आहे.

आणि तो गुणाकार सगळा कसला आहे, १ चा आहे. आणि आम्हाला कळलं पाहिजे कि ह्या एक मधूनच प्रत्येक आकडा निघतो. १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९. ह्या गुणाकारातूनच प्रत्येक आकडा बनतो म्हणजे काय? तर ह्या गुणाकारातूनच ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट बनते. आलं लक्षामध्ये? ९ हा पूर्णांक आहे ना आपण म्हणतो. पूर्ण. ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक, त्या एकातूनच बनतो. १ X १ = १, ११ X ११ = १२१, १११ X १११ = १२३२१, त्या पुढच्या मध्ये १२३४३२१, १११११ X १११११ = १२३४५४३२१, प्रत्येक ठिकाणी असं करत करत आपण ह्या ९ आकड्यापर्यंत येतो, १२३४५६७८९८७६५४३२१. मग हा एकच आकडा ह्या गुणाकाराच्या पद्धतीने जी ह्या त्रिविक्रमाची मोडस ऑप्रेंडी आहे.

आपण नेहमी एक शब्द वापरतो मोडस ऑप्रेंडी, पण आपण हा कोणाच्या बाबतीत वापरतो? गुन्हेगारांच्या बाबतीत. म्हणजे काम करायची पद्धत. पण हा जो त्रिविक्रम आहे, तोसुद्धा काम कसं करतो, त्याची काम करण्याची पद्धत कुठली? तर गुणाकार. हा वजाबाक्या करत नाही.

‘त्रिविक्रमाच्या गुणाकार अल्गोरिदम’बाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle