घोरकष्टोद्धरण स्तोत्र - पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र - पठणाचे महत्व’ The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram याबाबत सांगितले, ते आपण खालील व्हिडिओत पाहू शकता.

वरील व्हिडिओचे शब्दांकन पुढिलप्रमाणे आहे-

सद्गुरु एवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सदगुरुतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे. पण त्याचबरोबर ते पूर्ण चैतन्यमय आहे. सद्गुरुतत्त्व आपल्या भक्तासाठी कुठलेही रुप धारण करते. ह्या सर्व सृष्टीचा विकास ह्याच्याच मुळे घडतो. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

बापु पुढे म्हणाले की नुकतीच गुरुपौर्णिमा झाली, आता श्रावण महिना सुरु होत आहे. श्रद्धावान या मासास ' घोरकष्टोद्धरण स्तोत्र ' याचा महिना म्हणतात. ज्यांना घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठणस्थळी जाऊन म्हणता येईल त्यांनी तिकडे जाऊन म्हणा, पण ज्यांना तिकडे जाणे शक्य नाही त्यांनी घरी तरी घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण करावे. तिकडे गेलात तर अति उत्तम घरी केले तरी कुठे फुकट गेले. किती वेळ लागतो घोरकष्टोद्धरण स्तोत्र याचे १०८ वेळा पठण करायला? दोन ते अडीच तास काही जण तर फास्ट म्हणतात त्यांना तर दीड तासच लागतो. फास्ट म्हणालात यात चुकीचे काही नाही, म्हणालात हे महत्त्वाचे.

पण मनापासून सांगतो बाळांनो, १०८ वेळा म्हणताना त्या दत्तगुरुनां तुम्ही एकदा तरी प्रेमाने पाहिले सद्गुरुतत्त्वाला एकदा तरी प्रेमाने पाहिले, तरी १०८ वेळा म्हणण्याचे पुण्य मिळते. अरे पण त्या दीड तासात माझ्या हातुन काही वाईट काम तरी नाही झाले, हा तर फायदा झाला, कमीत कमी त्या दीड तासात माझ्या हातून पाप तरी घडले नाही व चुकीची काही गोष्ट घडली नाही आणि चांगले स्तोत्र म्हटले गेले. मानसिक नाही पण वाचिक जप तर झाला. त्याचे ही चांगले परिणाम असणारच आहेत. म्हणून सांगतो श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा महिना. त्या जगदंबेने त्या महात्रिपुराम्बेने त्या चण्डिकेने डाव्या कानाला शंख लावलेला आहे. हा शंख आईने हाक ऐकण्यासाठी कानाशी धरला आहे. परशुरामाची हाक ऐकण्यासाठी म्हणजेच परशुरामावर प्रेम करणार्‍या प्रत्येक भक्ताची.

आलं लक्षामधे, इकडे सोपा मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे स्तोत्र, भगवान दत्तात्रेयांचे स्तोत्र लिहिणारे कोण साक्षात ‘श्रीवासुदेवानंद सरस्वती’ हे स्तोत्र आहे किती छोटे ५ श्लोकांचे. म्हणायला किती वेळ लागणार १.३० तास, २.०० तास, २.३० तास आणि संपुर्ण दिवसात थोडे थोडे म्हणा पण दिवसाला १०८ वेळा म्हणा, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन करा. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या गावो-गावी करा. तुमच्या गल्लीत करा, तुमच्या ऑफिसमध्ये करा पण राजांनो करा, थोडा वेळ तुमच्या मुलांना म्हणता नसेल येत तर त्याला घेऊन बसा आणि ५ वेळा तरी म्हणायला लावा, असे आपल्या बापूंनी सांगितले.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥