मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच- ०२ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything- 02) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई आणि तिचा पुत्र त्रिविक्रम सर्वकाही जाणतातच’ (The Aadimata And Her Son Trivikram Know Everything) याबाबत सांगितले.

आदिमाता (मोठी आई) आणि तिचा पुत्र, तुम्ही त्या पुत्राला महाविष्णू, परमशिव, प्रजापति किंवा त्रिविक्रम काहीही म्हणा, पण या दोघांना काही समजत नाही किंवा कळू शकत नाही असा विचार करण्याची चूक कधीच करू नका. आणि जर ही गोष्ट कधी घडली तर घडल्या घडल्या मनुष्य मोठ्या आईच्या इच्छेच्या प्रांतातून नियमांच्या प्रांतात लगेचच ढकलला जातो.

नियमांच्या प्रांतात मग फक्त नियमच लागू होतात, जेवढे पुण्य कराल तेवढ्याचेच आणि तेवढेच फळ मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त फळ एरवी मोठी आई आणि तिचा पुत्र देत रहातात, तसे ते मिळणार नाही आणि ज्या चुका कराल त्या चुकांची शिक्षासुद्धा तेवढीच भोगावी लागेल. लोक तुमच्याशी कसे वागतील तिकडे तो त्रिविक्रम हस्तक्षेप करायला धावून येणार नाही हे आम्हाला माहीत पाहिजे.

आयुष्यात कितीही काहीही झाले तरी ही मोठी आई आणि तिच्या पुत्रावर त्यांना काही कळत का नाही असा संशय मात्र कधीच घेऊ नका, असे आपल्या बापूंनी सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥