गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ८
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.
‘विच्चे’, हे अव्यय आहे. मराठी ज्यांना कळतं किंवा संस्कृत ज्यांना माहिती आहे व्याकरण, ग्रामर, ‘विच्चे’ हे अव्यय आहे, अव्यय. व्यय, ज्याचा व्यय होत नाही, जिसका व्यय नहीं होता है, उसे अव्यय कहते हैं और किसी भी रूप में, किसी भी अवस्था में, किसी भी कार्यस्थिति में उसमें बिलकुल बदलाव नहीं होता, वह अव्यय है।
‘विच्चे’ हे अव्यय आहे आणि हे अव्यय आहे, नम: आणि स्वाहा ह्यांच्याप्रमाणे कुठल्या क्रियापदापासून उत्पन्न झालेलं नाही आहे, कुठल्या धातुपासून उत्पन्न झालेलं नाही आहे, तर हे पूर्ण स्वतंत्र आहे. नम: कसं नम् - नमामि पासून निर्माण झालेलं आहे, तसं हे ‘विच्चे’ विच्च् -विच्चामि पासून निर्माण झालेलं नाही आहे. हे पूर्णपणे स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे सर्वतंत्र, सर्वस्वतंत्र आहे, सर्वसमर्थ आहे, सर्वार्थसमर्थ आहे.
‘विच्चे’ हे अव्यय आहे, त्याचा अर्थ काय? ‘विच्चे’ म्हणजे डोळ्याने परमेश्वराचं, परमात्म्याचं रूप, आदिमातेचं रूप पाहण्यापासून, नुसतं पाहण्यापासून, खूप महत्वाची गोष्ट सांगतो राजांनो लक्षात घ्या. विच्चे चा अर्थ काय? तर परमात्म्याचं किंवा आदिमातेचं रूप, दत्तात्रेयांचं रूप नुसत्या डोळ्यांनी पाहण्यापासून त्याच्या चरणांवर नजर रोवण्यापर्यंत पासून, त्याचं ध्यान करण्यापासून, त्याला नमस्कार करण्यापासून, त्याची षोडशोपचारे पूजा करण्यापासून, त्याला अभिषेक करण्यापासून, त्याला नैवेद्य दाखवण्यापासून, त्याला पालखीत घालून मिरवण्यापासून, त्याच्या श्रेष्ठ तीर्थयात्रेला जाण्यापासून, त्याच्या समोर यज्ञ करण्यापासून जे जे म्हणून उपचार, जे जे म्हणून क्रिया भक्तासाठी करणं आवश्यक आहे, ती प्रत्येक क्रिया एकत्र सगळ्या क्रिया मिळून म्हणजे विच्चे, आलं लक्षामध्ये.
‘विच्चे’ म्हणजे काय? नुसती मूर्ती पाहण्यापासून किंवा डोळे बंद करून त्याची आकृती पाहण्यापासून ती त्याची चरित्रं-वाचनापर्यंत, त्याच्या मंत्राच्या उच्चारापासून मंत्रपठणापर्यंत, दररोज दहा वेळा म्हणण्यापासून ते एक कोटीचा संकल्प करण्यापर्यंत, त्याला अभिषेक घालण्यापासून रामेश्वरला जाऊन किंवा काशीला जाऊन कावड आणून त्याला अभिषेक घालण्यापर्यंत, घरातल्या पाण्याने घातलेला अभिषेक काय किंवा तिकडून आणलेलं, अभिषेक काय सगळं, साध्या होमापासून सावंत्सरिक यज्ञापर्यंत म्हणजे एक वर्ष चालणार्या यज्ञापर्यंत जी जी म्हणून भक्ताची क्रिया भगवंतासाठी अर्पण केली जाते, ती सर्व क्रिया एकत्र म्हणजे ‘विच्चे’ आलं लक्षामध्ये ‘विच्चे’.
सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll