गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ७

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.

त्याचप्रमाणे वर्तमानकाळात तर तो राहणारच आहे, ऑब्व्हियसली. प्रत्येक गोष्ट जी घडत असेल, ती घडवताना तुमची सर्व सेफ्टी बघण्याचं काम हा करणारच आहे, आपोआपच. तो चारी बाजूला असणार आहे वर्तमानकाळामध्ये. तर ह्या मंत्रामधली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ‘विच्चे’. विच्चे, ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे।’ ऐं, ह्रीं आणि क्लीं हे तीन ही बीजमंत्र आपण बघितलेले आहेत. तर हे तीन मंत्र, शेवटी काय काम करतात हे तीन बीजमंत्र? सर्वबाधाप्रशमनम्‌, सर्वपापप्रशमनम्‌ आणि सर्वकोपप्रशमनम्‌च कार्य करत आहेत.

पण ‘विच्चे हा मात्र जो शब्द आहे ना, हा अतिशय अद्‍भुत आहे. हा शब्द संपूर्ण संस्कृतमध्ये इतर कुठे ही वापरला गेलेला नाही. अंडरलाईन करा जे नोट्स काढतात त्यांनी.

ये ‘विच्चे’ जो शब्द है, विच्चे ये शब्द पूरे संस्कृत वाड्मय में कभी भी, किधर भी ललितवाड़्मय से लेकर, कांदबरी से लेकर, नाटिका नाट्य से लेकर, वेदों तक कहीं भी इसका उच्चार या उल्लेख नहीं किया गया है या नहीं लिखा गया हैं।

ये ‘विच्चे’, ‘च’ ला ‘च’ आणि वरती एक मात्रा. दोन मात्रा नाहीत, एक मात्रा. ‘विच्चे’, हे काय आहे? नेहमी आपल्याला सवय काय ॐ अमुक, तमुक, ढम, पम, रम जे काय असतं ते अमक्याय, तमक्याय नम: ओ.के. साईनाथाय नम:, स्वामीसमर्थाय नम:, दत्तात्रेयाय नम: किंवा स्वामीसमर्थाय स्वाहा बरोबर, साईनाथाय स्वाहा, रामचंद्राय स्वाहा म्हणजे देवाचं नाव असेल पुल्लिंगी असेल तर साईनाथाय ओ.के, तर महिषासुरमर्दिनी स्त्रीलिंगी नाम आहे तिकडे महिषासुरमर्दिन्यै नम:, महिषासुरमर्दिन्यै स्वाहा. चतुर्थी एक वचन संस्कृतमधलं लागतं आणि त्याच्यापुढे नम: किंवा स्वाहा येतं.

इकडे मात्र, इकडे काय येतं? नम: म्हणजे स्वाहा म्हणजे काय आलं? तर क्रिया आली, बरोबर किंवा विशिष्ट गोष्ट म्हणजे क्रियेचं रूप, मात्र बघा नम: हे कसं आहे? स्वाहा हे कसं आहे? की देव असो की देवी, पुल्लिंग असो की स्त्रीलिंग या नम: मध्ये आणि स्वाहा मध्ये काही फरक होत नाही. म्हणणारी व्यक्ती पुरूष आहे की स्त्री आहे ह्याच्या वरून पण फरक होत नाही, बरोबर. म्हणजे नम: मी म्हणू शकतो, नम: मी म्हटलं तर मग आम्ही एकटा असेल तर नम: मी म्हणायला पाहिजे, दोन जण असू तर वेगळं म्हणायला पाहिजे, अनेक जण असू तर वेगळं म्हणायला पाहिजे. पण कितीही लोक म्हणत असले तरी नम:च म्हटलं जातं, स्वाहाच म्हटलं जातं.

इकडे त्याच्याहीपेक्षा अद्‍भुत गोष्ट आहे, पण नम: मध्ये आणि स्वाहा मध्ये आम्हाला कृती काय ते कळतं. तर नम: म्हणजे काय? तर नमस्कार करणं, नमस्कार असो, बरोबर. स्वाहा म्हणजे काय? तर मी अर्पण करतो. विच्चे शब्द मात्र कुठेही वापरलेला गेला नाही आहे, हा एकाच ठिकाणी वापरला गेलेला आहे. इतर तीन-चार ठिकाणी तो वापरला गेलाय म्हणजे कसा? तर ह्या मंत्राचा उल्लेख करण्यासाठी म्हणून, ह्या मंत्राचं स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून. म्हणून त्याला इतर ठिकाणी कुठेही तो स्वतंत्रपणे वापरला गेलेला नाही आहे शब्द.

विच्चे, हे क्रियापद नाही आहे, विच्चे ही क्रिया नाही आहे, विच्चे हे विशेषण नाही आहे. विच्चे, अ‍ॅटलिस्ट, नम: आणि स्वाहा ह्याच्यावरून क्रिया स्पष्ट होते, अस्तित्व स्पष्ट होतं स्वाहारूपाने ती अनूसयामाताच आहे, हे मातृवात्सल्यविंदानम्‌च्या रुपाने अनुभवलेलं आहे, बरोबर. पण विच्चे मध्ये आम्हाला काहीच कळत नाही, म्हणजे अतिशय सुंदर विलक्षण. भारतीय संस्कृतीमध्यील ऋषिंचं हे सर्वश्रेष्ठ चिंतन हे ‘विच्चे’ रूपाने बाहेर आलं.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll