गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ३

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘ गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ३’ याबाबत सांगितले.

 

आम्ही जेव्हा हा मंत्र त्याच्याबरोबर उच्चारणार आहोत, तेव्हा हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कशाचं काम करणार आहे? पुढे पुढे आम्हाला नेण्यासाठी, आमचा पुढचा मार्ग निर्घोर करण्याचं काम करणार आहे. त्याच्या उच्चारानंतर बाकीचे सगळे उच्चार असल्यामुळे आमचा उच्चार अधिकाधिक चांगल्या मार्गाने, अधिक चांगल्या स्थितीमध्ये, अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये, अधिक-अधिक चांगल्या स्तरावरून घडण्यासाठी. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं, आपण जंगलामध्ये रस्त्यातून चाललो आहोत, धड रस्ता नाही आहे, वाटेत आडवी झुडपं येताहेत, वन्य प्राणी येताहेत, साप येताहेत, रात्रीची वेळ आहे, दिसत नाही, खड्डे आहेत अशा वेळेस जर आपल्या समोरून कोणी बॅटरी घेऊन जर चालत असेल, एवढंच नव्हे तर त्याच्या हातामध्ये शस्त्र असेल, पिस्तूल पण आणि एक काठी पण, वाघ दिसला तर गोळी मारायला, साप दिसला तर काठी घेऊन मारायला, तर आपण कसे निर्घोरपणे पुढे जाऊ ना. म्हणजे तो आपल्या अग्रणी चालणारा जो आहे, तो अग्रणी सेनापती जो आहे, त्याच्या हातात पिस्तूल पण पाहिजे आणि काठी पण पाहिजे आणि त्याचबरोबर बॅटरी पण पाहिजे. बॅटरी पाहिजे, काठी पाहिजे आणि पिस्तूल पण पाहिजे, बरोबर, तरच तुमचा प्रवास रात्रीच्या बिकट अरण्यामध्ये रात्रीच्या वेळेससुद्धा व्यवस्थित होऊ शकतो.

तसा जीवनातला प्रवास असाच असतो, आम्हाला प्रकाश वाटतो, तो प्रकाश नसतोच. जे खरं वाटतं ते खरं नसतंच, जे खोटं वाटतं ते खोटं नसतंच. जो मनुष्य साधासुधा वाटतो, तो लबाड निघतो, लबाड वाटतो, तो साधासुधा निघतो, काही कळत नाही, बरोबर. जी गोष्ट चांगली म्हणून हातात घ्यावी, ती चुकीची निघते, औषध घ्यायला जावं, ती विषाचा परिणाम करून जाते.

अशा ठिकाणी जीवनाच्या प्रत्येक अनुभवामध्ये आम्हाला एक अग्रणी सेनापती लागतो आणि तो अग्रणी सेनापती आम्हाला ह्या गुरुमंत्रामुळे मिळतोय आणि हा ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा मंत्र एरवी उच्चारण केला, तर फक्त अशुभनाशनाचं कार्य करतो, देवीला आवाहन करण्याचं काम करतो मातेला, जागृत करण्याचं काम करतो ह्या ‘गुरुमंत्रामध्ये तो अग्रणी सेनापती असल्यामुळे त्या महिषासुरमर्दिनीच्या कृपेमुळेच हा मंत्र जो आहे, तो कसलं काम करतो? ध्वजेचं काम करतो, ध्वजा म्हणजे अग्रगण्य सेनापतीचं काम करतो, अग्रणी सेनापतीचं काम करतो म्हणजेच तो तुमच्या जीवनामध्ये बॅटरी घेऊन, काठी घेऊन आणि बंदूक घेऊन, पिस्तूल घेऊन तुमच्या पुढे चालतो. तुमच्या मनाच्या पुढे चालतो, तुमच्या बुद्धीच्या पुढे चालतो, तुमच्या जागृत मनाच्या पुढे चालतो, तुमच्या अजागृत मनाच्या पुढे चालतो, तुमच्या भविष्याच्या पुढे चालतो. तुमच्या भविष्याच्याही पुढे चालतो हे लक्षात घ्या.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी  प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll