गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग २

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘ गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग २ (The significance of Guru-kshetram mantra in Shraddhavan's life - Part 2) ’ याबाबत सांगितले.

 

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.

हा एक मंत्र असा मंत्र आहे, हा तीन घटकांनी बनला आहे, पण ह्या तीनही घटकांनी बनलेला हा जो मंत्र आहे, हा मनुष्याच्या त्रिविध शरीरांवर कार्य करतो. त्रिविध देह म्हणजे काय? तर भौतिक देह, मनोमय देह आणि प्राणमय देह. ह्या तीनहीवरती समानपणे काम करतो. वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या तीनही काळांवर समानपणे कार्य करतो.

सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या तीनही गुणांवर समानपणे कार्य करतो. कफ, पित्त आणि वात ह्या शरीरातल्या तीन प्रमुख गुणांवर, धातुंवर किंवा दोषांवर तो समानपणे कार्य करतो, असा हा मंत्र आहे. मन:-प्राण-बुद्धी, मन:-प्राण-प्रज्ञा ह्या तीन व्याहृतींवर समानपणे कार्य करतो आणि त्याचबरोबर महत्वाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या मंत्राची म्हणजे की हा मंत्र मनुष्याची जागृतावस्था, निद्रा आणि स्वप्नावस्था ह्या तीन ही अवस्थांमध्ये पण कार्य करतो.

तो मनुष्य झोपलेला असतानापण ह्या मंत्राचं कार्य त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर, त्याच्या आजुबाजूच्या वातावरणावर होत राहतं, तो, तो मंत्र म्हणत नसेल तरीही. जर त्याने सकाळी तो म्हटलेला आहे किंवा दुपारी म्हटलेला आहे, तर रात्री तो झोपलेला असताना पण तो मंत्र त्याच्यासाठी कार्य करीत राहतो, असा हा मंत्र आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी  प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

 

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll