गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग १२

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले. 

जे जे काही करायचं, ते फक्त तीन पदक्षेपात करतो, तीन पावलांमध्ये करतो, तीन शब्दांमध्ये करतो, आलं लक्षामध्ये! म्हणून तो ‘‘त्रिविक्रम’ आहे आणि करतो म्हणजे यशस्वीपणे करतो, बेस्ट करतो. त्याच्या जागी दुसरं कोणीच असू शकत नाही म्हणून तो ‘त्रिविक्रम’ आहे आणि अशा ह्या त्रिविक्रमाच्या निलयामध्ये हा मंत्र आम्हाला नेतो आणि मग आम्हाला सांगितलं जातं की ‘सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं श्रीगुरुक्षेत्रम्‌’.

सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं, हे सर्वसमर्थं आहेच स्वत:, हे सर्वार्थसमर्थं पण आहे. म्हणजे प्रत्येकाचा जो-जो अर्थ आहे, म्हणजे जो-जो पुरुषार्थ प्रत्येकाला करायचा आहे, त्याचा पुरवठा करायला पण समर्थ आहे. एखादा नुसता चांगला संगीतकार असेल, त्याला चांगलं गाता येत नसेल तर उपयोग नाही, एवढंच नाही, तर त्याला चांगलं शिकवता पण यायला पाहिजे. म्हणजे स्वत:च चांगला संगीत दिग्दर्शक आहे, स्वत:च चांगला गायक पण आहे आणि स्वत:च चांगला गायनाचा शिक्षक पण आहे.

ह्या तीनही गोष्टी जाणणं, करणं आणि शिकवणं, जाणणं, करणं आणि शिकवणं ह्या त्या तीन गोष्टी आहेत. पहिल्यांदा जाणलं पाहिजे, मग करता आलं पाहिजे आणि ते दुसर्‍याला शिकवता आलं पाहिजे. तसंच्या तसं तितकंच आणि स्वत: जेवढा बेस्ट आहे, तेवढाच बेस्ट शिष्य तयार करता आला पाहिजे किंवा आपल्यापेक्षा बेहतर, बेटर शिष्य तयार करता आला पाहिजे. ते सर्वार्थसमर्थत्व. सर्वार्थसमर्थं म्हणजे काय? तर त्या क्षेत्रातील ते क्षेत्र सर्वसमर्थ आहेच, पण येणार्‍या प्रत्येकाला ते सर्वसमर्थ बनवू शकतं, ही त्याची कपॅसिटी आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll