गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ११

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले. 

श्रीगुरुक्षेत्रम्‌ मध्ये काय आहे? ह्या त्रिविक्रमाचं निलयं आहे, आलय नाही, गृह नाही, तर निलयं आहे. ह्या मंत्राच्या जपाने, ह्या मंत्राचा स्वीकार करून आम्ही कुठे राहायला जातो? त्या सद्‍गुरुतत्त्वाच्या निलयं मध्ये म्हणजे अंतरगृहामध्ये, सिम्पल, समजलं आणि कसे? तर विच्चे, बेस्ट होऊन. आम्ही ह्या मंत्राचा स्वीकार केला याचा अर्थ आम्ही पन्नास टक्के बेस्ट झालेलो आहोत, पन्नास टक्के उरलयं, पण आमच्याकडे दोन टक्केही नव्हतं, आज पन्नास टक्के आलंय, बरोबर! किती जोम यायला पाहिजे आम्हाला सांगा, बरोबर आणि ह्या ‘विच्चे’ मधून आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे.  म्हणून म्हटलं की ‘विच्चे’ हा अद्‍भुत शब्द आहे.

‘निलयं’ हा तसाच अद्‍भुत शब्द आहे. हा कुठेही वापरला जातो, लहान-सहान कोणाच्या घरालाही नाव असतं, अमुक निलयं-तमुक निलयं वगैरे. पण इथे हे ‘त्रिविक्रमनिलयं’ आहे, जो कुठलीही गोष्ट फक्त तीन पावलांत करू शकतो, त्याला ‘त्रिविक्रम’ म्हणतात, जो कुठलीही गोष्ट फक्त तीन पावलांत करू शकतो. पृथ्वी व्यापायची आहे, स्वर्ग व्यापायचा आहे... हे व्यापायचं आहे, पाताळ व्यापायचं आहे, तीन पावलांत व्यापणार, अनंत ब्रह्मांडं व्यापायची आहेत, तीन पावलांत व्यापणार, महाभारतासारखं युद्ध खेळायचं आहे. भीष्माच्या दिशेने फक्त तीन पावलं उचलली त्याने, बस.

ना धरी शस्त्र करी मी! हातात शस्त्र धरणार नाही, मैं हात में शस्त्र नहीं धरूंगा ये कहनेवाले श्रीकृष्ण, जिसने कभी हात में शस्त्र पकड़ा ही नहीं महाभारत युद्ध में, लेकिन क्या किया? जब भीष्माचार्यजी ने आह्वान दिया, आवाहन दिया, आह्वान नहीं आवाहन चॅलेन्ज किया तो उसने, वो सिर्फ तीन कदम चला, तीन कदम चलने से उस त्रिविक्रम ने महाभारत युद्ध जो कौरवों के पक्ष में जा रहा था वो पूरा पांडवों के पक्ष में लाकर उनके गले में यशस्विता की माला डाल दी, माला डाल दी।

जो विजय, जय कौरवांच्या पक्षाला मिळेल असं वाटत होतं त्या क्षणापर्यंत, कृष्णाने ही तीन पावलं चालली आणि ते संपूर्ण अठरा अक्षौहिणी वगैरे अमुक-अमुक म्हणजे ऑलमोस्ट एकशे ऐंशी कोटी वगैरे सैन्य काय झालं? एक क्षणात विनष्ट झालं आणि कोण जिंकले? पांडवच जिंकले.

त्याचे फक्त तीन शब्द काही करू शकतात, मात्र ते तीन शब्द सगळ्यात महत्वाचे आहेत त्या त्रिविक्रमाचे. त्रिविक्रमाच्या ह्या तीन शब्दांनी काहीही होतं. कुठले तीन शब्द ते? त्रिविक्रमाचे तीन शब्द कुठले? सोपं आहे, ‘तू माझाच आहेस’ हे ते तीन शब्द.

‘तू सिर्फ मेरा ही है’, ‘तू मेरा ही है’ सिर्फ लावलं की मग त्याला आणखीन चार शब्द होतात, मराठीचा अर्थ जात नाही. ‘तू मेरा ही है’, ‘तू माझाच आहेस’ आलं लक्षामध्ये. हे तीन शब्द ह्या तीन शब्दांनी तो सगळं काही करतो. हे तीन शब्द तुम्हाला मिळाले कि तुम्ही बेस्टेस्ट झालातच, हे त्याचे तीन शब्द मिळण्यासाठी आणि कायमचे राखण्यासाठी, देवाने दिलं आणि कर्माने आम्ही घालवलं असं होऊ नये, म्हणून ह्या गुरुमंत्राचा जप आवश्यक आहे, की त्याने म्हटलं ‘तू माझाच आहेस’, ‘तुम्ही माझेच आहात’, परंतु त्याने म्हटलं ते मिळालं, पण राखता आम्हाला आलं पाहिजे ना, ते राखण्यासाठी पण हा मंत्रच कामाला येणार आहे. संपूर्ण गुरुक्षेत्रमंत्र म्हणजे हा गुरुमंत्र. हे तीन शब्दांमध्येच तो काम करतो आणि ज्याक्षणी तो म्हणतो ‘मी तुझा नाही आहे’ त्याक्षणी सगळं संपतं लक्षात ठेवा. मग तो मनुष्य फक्त स्वत:च्या कर्मावर जगत राहतो, त्याला कसलंही दैवी सहाय्य मिळू शकत नाही, त्याची गत धृतराष्ट्रासारखी होते तो मरतपण नाही आणि जगतपण नाही.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll