श्रीअनिरुद्धांची षष्ठ्यब्दिपूर्ति

॥ हरि ॐ॥ ॥ श्रीअनिरुद्धांची षष्ठ्यब्दिपूर्ति॥ परमपूज्य बापूंच्या प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या जीवनात ‘अनिरुद्ध पौर्णिमे’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक अनिरुद्ध पौर्णिमा तेवढीच महत्त्वाची. यंदाही बापूंचे श्रद्धावान भक्त ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ साजरी करणार आहेत. तिथीनुसार ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ सोमवार दि. १४-११-२०१६ रोजी असली, तरी आपण मात्र प्रथेप्रमाणे ती शनिवार दि. १९-११-२०१६ रोजी ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे साजरी करणार आहोत. आपण सर्वांनी बापूंच्या पन्नासाव्या वाढदिवशी ‘श्रीअनिरुद्ध सुवर्णजयंती महोत्सव’ साजरा केला. आपल्यातील अनेकजणांनी त्यात सहभागी होऊन त्या सोहळ्याचा आनंद लुटला. ह्या वर्षी परमपूज्य बापू साठ वर्षे पूर्ण करून एकसष्ठाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने अनेक श्रद्धावानांनी व अनिरुद्ध उपासना केंद्रांनी आपापल्या परीने पठणाचे व भक्तिमय सेवेचे उपक्रम हाती घेतले होते. ‘ह्या अनिरुद्ध पौर्णिमेलाही सुवर्णजयंती महोत्सवासारखीच सोय असणार का’ अथवा ‘आम्ही बापूंना काही देऊ शकतो का’ अशी विचारणा होत होती. आपणां सर्वांना माहीतच आहे की बापू स्वतः व्यक्तिशः कोणाकडून काहीही स्वीकारत नाहीत; आपल्या सर्वांकडून निरपेक्ष भक्ती व सेवा व्हावी अशी त्यांची इच्छा असते. त्याचबरोबर आपल्याला हेदेखील माहीतच आहे की पन्नासाव्या वाढदिवसालाही बापूंनी उत्सवाचे, पूजनाचे इत्यादि सर्व धन संस्थेलाच देण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे बापूंच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व बापूंचे श्रद्धावान मित्र आपापल्या इच्छेनुसार, संस्थेच्या कार्यास यथोचित देणगी देऊ शकतो, जी आपण बापूंच्याच चरणी अर्पण करत आहोत, हाच प्रत्येक श्रद्धावानाचा भाव असेल, हाच प्रत्येक श्रद्धावानाचा विश्‍वास असेल व तसाच बापूंचाही संकल्प आहे. सद्गुरुंवरील हा विश्‍वासच प्रत्येक श्रद्धावान मित्राला आधार देत असतो, दिलासा देत असतो. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्रद्धावान आपली देणगी देऊ शकतात. ज्यांना गुप्तदान (क्षेमदक्षिणा) करावयाचे आहे, त्यांच्याकरिता दक्षिणापेटीचीही सोय नेहमीप्रमाणे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे श्रद्धावान ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ येथेही क्षेमदक्षिणा अर्पण करू शकतात. तूर्तास अनेकांना रोखीने दक्षिणा देण्यास अडचण असू शकते, त्यांच्यासाठी क्रेडिट/डेबिट कार्ड स्वीकारण्याचीही विशेष सोय करण्यात आलेली आहे. श्रद्धावान आपल्या देणग्या सोमवार दि. १४-११-२०१६ पासून देऊ शकतात. श्रीअनिरुद्धांनी सुरू केलेल्या कार्याचा प्रचंड वाढता विस्तार आज आपण सर्वजण अनुभवतच आहोत. बापू त्यांचे कार्य करीतच आहेत, आपण आपले कार्य करूया, आपण आपला वाटा उचलूया! समिरसिंह दत्तोपाध्ये (अधिष्ठाता)


॥ श्रीअनिरुद्ध की षष्ठ्यब्दिपूर्ति॥ परमपूज्य बापू के हर एक श्रद्धावान भक्त के जीवन में ‘अनिरुद्ध पूर्णिमा’ का महत्त्व अनन्यसाधारण है। हर एक अनिरुद्ध पूर्णिमा उतनी ही महत्त्वपूर्ण होती है। इस वर्ष भी बापू के श्रद्धावान भक्त अनिरुद्ध पूर्णिमा मनानेवाले हैं। तिथि के अनुसार हालाँकि ‘अनिरुद्ध पूर्णिमा’ सोमवार दि. १४-११-२०१६ को है, मग़र फिर भी हम परिपाटी के अनुसार उसे शनिवार दि. १९-११-२०१६ को ‘श्रीहरिगुरुग्राम’ में मनानेवाले हैं। बापू के पचासवें जन्मदिन के अवसर पर हम सबने ‘श्रीअनिरुद्ध सुवर्णजयंती महोत्सव’ मनाया था। हममें से अनेक श्रद्धावान भक्तों ने उसमें सम्मिलित होकर उस समारोह का आनंद प्राप्त किया था। इस वर्ष परमपूज्य बापू अपनी उम्र के साठ वर्ष पूरे करके इकसठवें वर्ष में प्रवेश कर रहे हैं। इस उपलक्ष्य में अनेक श्रद्धावानों ने तथा अनिरुद्ध उपासना केंद्रों ने अपनी अपनी क्षमता के अनुसार पाठ एवं भक्तिमय सेवा के उपक्रम किये थे। ‘क्या इस अनिरुद्ध पूर्णिमा को भी सुवर्णजयंती महोत्सव की तरह ही कोई विशेष आयोजन किया जानेवाला है’ या ‘क्या हम बापू को कुछ दे सकते हैं’ इस तरह के प्रश्‍न पूछे जा रहे थे। हम सब यह जानते ही हैं कि बापू स्वयं व्यक्तिशः किसी से भी कुछ भी स्वीकार नहीं करते हैं; हम सब निरपेक्ष भक्ति एवं सेवा के पथ पर चलते रहें, यही उनकी इच्छा रहती है। उसी तरह हम यह भी जानते हैं कि पचासवें जन्मदिन पर भी बापू ने उत्सव, पूजन आदि का सारा धन संस्था को ही देने के लिए कहा था। उसी तरह बापू के साठवें जन्मदिन के उपलक्ष्य में हम सब बापू के श्रद्धावान मित्र अपनी अपनी इच्छा के अनुसार, संस्था के कार्य के लिए यथोचित दान (डोनेशन) कर सकते हैं, ‘जो हम बापू के ही चरणों में अर्पण कर रहे हैं’ यही हर एक श्रद्धावान का भाव होगा, यही हर एक श्रद्धावान का विश्‍वास होगा और बापू का भी वैसा ही संकल्प है। सद्गुरु के प्रति रहनेवाला यह विश्‍वास ही हर एक श्रद्धावान मित्र को सहारा देता रहता है, दिलासा देता रहता है। हमेशा की पद्धति के अनुसार श्रद्धावान अपना डोनेशन दे सकते हैं। जो गुप्तदान (क्षेमदक्षिणा) करना चाहते हैं, उनके लिए दक्षिणापेटी (डोनेशनबॉक्स) की भी व्यवस्था हमेशा की तरह की गयी है। साथ ही, श्रद्धावान ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ में भी क्षेमदक्षिणा अर्पण कर सकते हैं। फिलहाल अनेक श्रद्धावान भक्तों को नगद दक्षिणा देने में दिक्कत पेश आ सकती है, उनके लिए क्रेडिट/डेबिट कार्ड का स्वीकार करने की विशेष व्यवस्था की गयी है। श्रद्धावान अपना डोनेशन सोमवार दि. १४-११-२०१६ से देना आरंभ कर सकते हैं। श्रीअनिरुद्ध के द्वारा शुरू किये गये कार्य का विशाल बढ़ता विस्तार आज हम सब अनुभव कर ही रहे हैं। बापू अपना कार्य कर ही रहे हैं, हम अपना कार्य करेंगे, हम अपना योगदान देंगे! समिरसिंह दत्तोपाध्ये (अधिष्ठाता)

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥