श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा – २०२० चा पारितोषिक वितरण समारंभ

श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा – २०२० चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. १२ जानेवारी २०२० रोजी होणार आहे. दरवर्षी ह्या कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण झाल्यावर दुसर्‍या सत्रामध्ये “अनिरुद्धाज् मेलोडीज्” च्या संगीताचा आनंद सर्व श्रद्धावान घेत असतात.

यावर्षी दुसर्‍या सत्रामध्ये अनिरुद्धाज् मेलोडीज्‌च्या लाईव्ह वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाऐवजी आधी झालेल्या कार्यक्रमांमधील रेकॉर्डेड गाणी तसेच काही निवडक अभंग LED  स्क्रिनवर दाखविण्यात येतील. दुसरे सत्र साधारण एक ते दीड तासाचे असेल. आपण सर्वांनी बक्षिस घेणार्‍या श्रद्धावानांना बक्षिस समारंभास येऊन प्रोत्साहीत करुया. अल्पप्रमाणात प्रवेशिका उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणार्‍यास, प्रथम प्राधान्य” ह्या तत्वावर प्रवेशिका वितरित होतील ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रवेशिकांचे वितरण हॅपीहोमच्या स्टॉलवर, गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे व सी.सी.सी.सी कार्यालयामधून होईल. तसेच केंद्रांना ह्या प्रवेशिका हव्या असल्यास त्यांनी सी.सी.सी.सी कार्यालयात संपर्क करावा.

सुनिलसिंह मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी