श्रीहनुमान चलिसा पठण व चरखा शिबीर

हरि ॐ,

दिनांक १३ मे ते १९ मे २०१९ या काळात श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे दरवर्षीप्रमाणे श्रीहनुमान चलिसा पठण संपन्न झाले. या पठण काळात दररोज श्रीहनुमान चलिसेची १२३-१२५ आवर्तने झाली. याच काळात साईनिवास येथे चरखा शिबीरही संपन्न झाले.

’चरखा वस्त्र’ योजने अंतर्गत तयार झालेल्या सुतापासून दरवर्षी ’कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरात’ हजारो मुलांना शाळेचे गणवेश विनामुल्य पुरविले जातात. त्याचप्रमाणे विरार व पाली येथे होणाऱ्या वैद्यकिय शिबीरामध्येही गणवेश वाटप करण्यात येते. यासाठीच आपली संस्था दरवर्षी या काळात चरखा शिबीर आयोजीत करते.

या वर्षीच्या शिबीरात ७२५ श्रद्धावानांनी सहभाग घेतला व एकूण १३२३ लड्या जमा झाल्या.

। हरि ॐ । । श्रीराम । अंबज्ञ । । नाथसंविध् ।