श्रीअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – बसण्याच्या व्यवस्थेमध्ये केलेल्या वाढीबद्दल
हरि ॐ,
दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी होणार्या श्रीअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य या महासत्संग सोहळ्यासाठी काही श्रद्धावानांनी, मुख्यत्वे मुंबईबाहेरुन येणार्या श्रद्धावानांनी रु. ५००/- व रु. ७५०/- देणगी मूल्य असलेल्या प्रवेशपत्रिका उपलब्ध करुन देण्याविषयी विनंती केली होती.
श्रद्धावानांच्या या विनंतीनुसार बसण्याच्या व्यवस्थेमध्ये थोडे फेरबदल करुन आपण या प्रवेशपत्रिका (रु. ५००/- व रु. ७५०/- च्या) थोड्या प्रमाणात उपलब्ध करित आहोत. ह्या प्रवेशपत्रिका प्रथम येणार्यास, प्रथम प्राधान्य ह्या तत्वावर उपलब्ध असतील. तरी श्रद्धावानांना विनंती आहे कि, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
केंद्रातील श्रीगुरुसप्त संघ सेवकांना विनंती आहे कि, त्यांनी आपल्या केंद्रामधून इच्छुक श्रद्धावानांच्या नावांची सूची, या प्रवेशपत्रिका संपण्याच्या आधी, सी.सी.सी.सी. कडे जमा करावी.
ह्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास श्री. शैलेशसिंह नारखेडे (९८१९१२६३९९) यांच्याशी संपर्क करावा.
सुनिलसिंह मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी