श्रीअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – प्रसादालय व्यवस्था

हरि ॐ,

श्रीअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य या महासत्संग सोहळ्यामध्ये प्रसादालयाची सुविधा केलेली आहे. येणार्‍या सर्व श्रद्धावानांना खाण्याची व्यवस्था नीट करण्याच्या दृष्टीने ही सोय करण्यात आलेली आहे. प्रसादालयामध्ये नाष्ट्यासाठी व जेवणासाठी एकूण १८ गोष्टी ठेवण्याचे योजिले आहे. हा उत्सव व्रताधिराजाच्या काळात असल्यामुळे सर्व पदार्थ व्रताधिराजाला अनूकुल असे असतील.

येणार्‍या श्रद्धावानांची संख्या लक्षात घेऊन प्रसादालयामध्ये कोणत्या गोष्टी किती प्रमाणात लागणार याचा अंदाज लागणे गरजेचे आहे, कारण ३१ डिसेंबर असल्याकारणाने नेमलेल्या कॅटरर्सना त्याप्रमाणे तयारी करावी लागणार आहे.

श्रद्धावानांना आधी कळविल्याप्रमाणे प्रसादालयाच्या कुपन्सची आगाऊ नोंदणी श्रीहरिगुरुग्राम व लिंक अपार्ट्मेंट येथे चालू केलेली आहे. तसेच मुंबईबाहेरील श्रद्धावानांच्या सोयीसाठी पुढे दिलेल्या बँक अकाऊन्टमध्ये प्रसादालयाच्या कूपन्सचे मूल्य जमा करण्याची सुविधा सुरु केली आहे. सोबत जोडलेल्या मेनुप्रमाणे आपल्या केंद्रातील श्रद्धावानांना लागणार्‍या कूपन्स‍ची पदार्थाप्रमाणे एकूण संख्या ईमेलद्वारे ([email protected]) सी.सी.सी.सी. कडे कळवावी व सगळयांचे एकत्रित केलेले मूल्य बँकमध्ये जमा करावे. केंद्रांकडून त्यांची सूची उशीरात उशीरा सोमवार दि. २३ डिसेंबर २०१९ पर्यंत पाठवावी.

त्याचप्रमाणे रात्री परताना जर एखाद्या केंद्राला बसमध्ये खाण्यासाठी पॅकेटस् हवी असतील तर त्याची सोयसुद्धा करता येईल. त्यासाठी केंद्राने त्यांची ही संख्या व लिस्ट वेगळी कळवून त्याप्रमाणे त्याचे मूल्य पाठवून देणे आवश्यक आहे. (हा बँक अकाऊन्ट नंबर केंद्रांच्या ई-मेलवर पाठविलेला आहे)

बँकमध्ये जमा केलेले मूल्य त्याचदिवशी सी.सी.सी.सी कडे ई-मेलद्वारे पावतीच्या फोटोसहित कळवावे ही विनंती.

या सूचनेबरोबर श्रद्धावानांना हे ही कळविण्यात येते कि, हा महासत्संग सोहळा दुपारी बरोबर ३.३० ला सुरु होणार आहे. सगळ्या श्रद्धावानांना विनंती आहे कि, त्यांनी दुपारी २.३० पर्यंत आपल्या जागी स्थानापन्न व्हावे.

सुनिलसिंह मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी