श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्
सद्गुरु बापू आपल्या अग्रलेखांमधून व प्रवचनातून श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् या स्थानाचे महत्व आपल्याला सांगतच असतात. ह्याच श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् या तीर्थक्षेत्राच्या कामासंदर्भात आज दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ रोजी धूळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील काही मोजक्या श्रद्धावान सेवकांबरोबर हॅपी होम येथील माझ्या कार्यालयात मिटींग झाली. या मिटींगमध्ये महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह व महाधर्मवर्मन विशाखावीरा यांच्याबरोबर संस्थेचे CEO सुनीलसिंह मंत्री व महेशसिंह झांट्ये हेही उपस्थित होते. यात, ‘सद्गुरु बापूंनी श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् या तीर्थक्षेत्राच्या बांधणीचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे, तसेच या श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्च्या उभारणीचा एक भाग म्हणूनच बापूंच्या सांगण्याप्रमाणे या वर्षापासून अंमळनेर येथेही श्रीदत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येईल’ असे जाहीर करण्यात आले. हे या दत्तजयंती उत्सवाचे पहिले वर्ष असल्यामुळे या वर्षी हा उत्सव चार दिवस साजरा होणार आहे. याची सविस्तर माहिती सर्व उपासना केंद्रांना लवकरच कळवण्यात येईल.
मिटींग सुरू असतानाच परमपूज्य बापूंनी मिटींगला आलेल्या सर्व श्रद्धावान सेवकांना खाली आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले व श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् या तीर्थस्थानाची संकल्पना समजावून सांगितली. सर्व श्रद्धावान सेवकांना संकल्पना समजावून सांगताना बापू म्हणाले, "श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् हे आध्यात्मिक उपासनेचे, साधनेचे, ध्यानाचे, शांती व संतोषप्राप्तीचे महद्क्षेत्र आहे."
या संकल्पनेच्या अनुषंगाने श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम्च्या उभारणीचे काम यावर्षीच्या श्री दत्तजयंती उत्सवापासून सुरू करण्यात येईल. बापूंबरोबर झालेल्या श्रद्धावान सेवकांच्या चर्चेचे फोटोज् सोबत जोडत आहे.
। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।


