आदिमातेची मूर्ती पाहणे हे प्रत्यक्ष तिला पाहणेच आहे (Seeing Aadimata's Idol Is Equivalent To Seeing Her) - Aniruddha Bapu‬

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ आदिमातेची मूर्ती पाहणे हे प्रत्यक्ष तिला पाहणेच आहे’ (Seeing Aadimata's Idol Is Equivalent To Seeing Her) याबाबत सांगितले.

आदिमातेची मूर्ती बोलत नाही असे कुणाला वाटू शकते. परंतु यात मुळात ‘ही निव्वळ मूर्ती आहे’ हा भावच चुकीचा आहे. मातृवात्सल्य उपनिषदात काय म्हटले आहे - ‘ती तीच आहे’. कुठलीही मूर्ती असेल तिची, तिचे कुठलेही रूप असले तरी. आपण श्रीश्वासम्‌ उत्सवामध्ये एवढी रूपे पाहीली आहेतच. पण ‘ती तीच आहे’ हाच भाव आपल्या मनामध्ये कायम राहिलाच पाहिजे.

नवरात्रीमध्ये ‘दुर्गे दुर्घट भारी’ ही आरती दिवसातून एकदा तरी करायला पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी, किंवा दोन्ही वेळा, कितीही वेळा, तुपाचा किंवा तेलाचा, कुठलाही दिवा लावा, तरी आईला काही प्रॉब्लेम नाही. ज्योत एक ठेवू किंवा दोन ठेवू, पंचारती करू, धूपारती करू किंवा कापूर आरती करू ? जे कराल ते प्रेमाने करा.

मात्र मी नेहमी सांगतो आरतीच्या तबकामध्ये नुसते निरांजन ठेवून आरती कधी करू नये. यामुळे तुम्हाला काही पाप लागत नाही आणि अशुभ घडत नाही हे नक्की. पण एखादी सुपारी, हळदी-कुंकू, फुले, एखादे फुल, किंवा तुळसीचे पान तरी ठेवावे. आरतीच्या तबकात नुसता दीप एकटा कधी ठेवायचा नसतो काहीतरी, एकतरी देवाला अर्पण करण्याची गोष्ट ठेवायची असते हा संकेत ब्रह्मर्षि अग्स्त्य मुनींनी ब्रम्हवादिनी लोपामुद्रा हिला दिला आहे. ह्या लोपामुद्रेने लिहीलेले श्रीसूक्तम्‌ आपण गुरुवारी येथे म्हणतो.

ह्यामध्ये नक्कीच काहीतरी वैज्ञानिक कारण आहे. परंतु काही नाही मिळाले तर अक्षता वाहीन, तेही नसेल तर पान वाहीन, तेही मिळाले नाही तर ताम्हानात पळीने पाणी वाहीन. बस, जर प्रेमभाव असेल तर आई ते गोड मानूनच घेणार, असे आपल्या बापूंनी सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥