सद्गुरु अनिरुद्ध बापूंची उपासना

सर्व श्रद्धावानांना कल्पना आहेच की परमपूज्य सद्गुरु बापू मागील ३ गुरुवार श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी आलेले नाहीत. बापूंचे सलग ३ गुरुवार दर्शन न झाल्याने ब-याच श्रद्धावानांनी बापूंबद्दल आस्थेने व प्रेमाने चौकशी केली. त्या सर्व श्रद्धावानांना मी कळवू इच्छितो की बापू त्यांच्या अतिशय कठोर उपासनेत व्यस्त असून पुढील काही काळ ही उपासना चालू राहणार आहे. ह्या उपासनेच्या कारणास्तव परमपूज्य बापू गेले ३ गुरुवार श्रीहरिगुरुग्राम येथे आलेले नाहीत ह्याची कृपया श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

पुढील काही काळापर्यंत परमपूज्य बापूंचे श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी येणे हे त्यांच्या उपासनेवर अवलंबून असेल.

                                   

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥  

English       हिंदी